पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) सुमारे ६७९ कोटी ८९ लाख ८६ हजार रकमेच्या अर्थसंकल्पास मंगळवारी झालेल्या प्राधिकरणाच्या सभेत मंजुरी देण्यात आली. पाच कोटी २७ लाख २५ हजार रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे. मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे हेलिपॅड, औद्योगिक संग्रहालय, ओपन जीम, पेठ क्रमांक ११ येथे संविधान भवन, विपश्यना केंद्र, तसेच गृहयोजना प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाची सभा मंगळवारी झाली. यामध्ये प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी २०१९-२० या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सभेला सादर केला.त्यावर चर्चा झाल्यानंतर या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचे खाडे यांनी सांगितले.६७९ कोटी ८९ लाख ८६ हजार रकमेचा अर्थसंकल्प असून त्यात ६७४ कोटी ६२ लाख ६१ हजार एवढा खर्च अपेक्षित आहे. म्हणजेच ५ कोटी २७ लाख २५ हजार रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे. दरम्यान, प्राधिकरण सभेत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यास मान्यता देण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विकास होत असल्याने विविध कार्यक्रमांसाठी शहरात व्हीआयपी येत असतात. त्यामध्ये अनेकजण हेलिकॉप्टरचा वापर करतात. त्यामुळे प्राधिकरणामार्फत मोशीतील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी सुसज्ज हेलिपॅड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक कोटीच्या खर्चाची तरतूद केली आहे.याशिवाय मोशी येथे औद्योगिक संग्रहालय उभारण्यात येणार आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराच्या औद्योगिकनगरीचा प्रवास दाखविण्यात येणार आहे. तसेच औद्योगिकनगरीचे महत्त्व, शहरविकासात येथील कंपन्यांचे व उद्योजकांचे योगदान या विषयी माहिती दाखविली जाणार आहे. या प्रकल्पासाठीही तरतूद केली आहे.पेठ क्रमांक १२ मध्ये पाच हजार घरे बांधण्यात येणार असून, त्यासाठीच्या वर्क आॅर्डरही देण्यात आल्या आहेत. तसेच पेठ क्रमांक ६ मध्ये ३५० घरांची, तर पेठ क्रमांक ३० व ३२ मध्ये ७९२ घरांची उभारणी केली जाणार आहे. यासाठी या अर्थसंकल्पात ३२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.१९७२ ते ८४ च्या शेतकºयांना जमिनीचा साडेबारा टक्के परतावा देण्याबाबतचा विषय शासन स्तरावर आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, तर १९८४ नंतरची केवळ ८३ प्रकरणे त्यांच्यातील कौटुंबिक वादामुळे शिल्लक राहिली आहेत. प्राधिकरणातील कर्मचाºयांसाठी सातवा वेतन आयोग देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी सांगितले.>रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधीचा निधीऔंध-रावेत रस्त्यावर साई चौक येथे दोन समांतर उड्डाणपूल बांधण्यासाठी पाच कोटी, पेठ क्रमांक ११ मधील अंतर्गत रस्ते व त्यासाठी नाला करण्यासाठी ५ कोटी, चिंचवड जुना जकात नाका ते शिवाजी चौक रस्त्यासाठी ३.७५ कोटी, पेठ क्रमांक २९ व ३२ एमधील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २.५० कोटी, पेठ क्रमांक २९ मधील रावेत भागातील रस्ते विकसित करण्यासाठी १ कोटी व त्रिवेणीनगर येथील महापालिका हद्दीतील स्पाइन रस्त्याचे उर्वरित लांबीचे काम करण्यासाठी ५ कोटींची तरतूद केली आहे.>अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदीपेठ क्रमांक ५ व ८ येथे सोलर पार्कची उभारणी करणे - १ कोटीपेठ क्रमांक ११ मध्ये संविधान भवन व विपश्यना केंद्र बांधणे - ५ कोटीऔद्योगिक संग्रहालय, विरंगुळा केंद्र व ओपन जीम बांधणे - ८ कोटीआंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे हेलिपॅड उभारणे - १ कोटीचिंतामणी चौक ते पॉवर हाऊस २४ मीटर रुंद रस्ता- ५ कोटीपेठ क्रमांक २५ मधील सांस्कृतिक भवन बांधणे - ५ कोटीपेठ क्रमांक ६, १२, ३० व ३२ येथे गृहयोजना प्रकल्प राबविणे - ३२५ कोटी>ठळक वैशिष्ट्येमोशीत हेलिपॅड उभारणीगृहयोजनेत सहाहजार घरेसंविधान भवन व विपश्यना केंद्रमोशीत औद्योगिक संग्रहालयसांस्कृतिक भवन, विरंगुळा केंद्र
मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या जागेवर हेलिपॅड अन् औद्योगिक संग्रहालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 2:04 AM