शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

तीन हजार रुपयांसाठी पिंपरीत रंगले अपहरणनाट्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 7:03 PM

चार जणांच्या टोळक्याने पिंपरी रेल्वे स्थानकावर एका तरुणाला धरून ठेवले. त्याला दमदाटी केली. त्याच्याकडून कुटुंबीयांचा मोबाइल क्रमांक घेतला.

पिंपरी -  चार जणांच्या टोळक्याने पिंपरी रेल्वे स्थानकावर एका तरुणाला धरून ठेवले. त्याला दमदाटी केली. त्याच्याकडून कुटुंबीयांचा मोबाइल क्रमांक घेतला. त्याच्या वडिलांना मोबाइलवरून संपर्क साधला. तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे़ ताबडतोब रेल्वे स्थानकावर तीन हजार रुपये घेऊन या, असे सांगितले. तरुणाचे वडील धावपळ करीत रेल्वे स्थानकावर आले़ अपहरणकर्त्यांना तीन हजार रुपये दिले. तीन हजर रुपये रोख तसेच घड्याळ, मोबाइल जबरदस्तीन हिसकावून टोळके पसार झाले. याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली, परंतु तत्पूर्वी लुबाडणूक करून अपहरणकर्ते पसार झाले होते. पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्यांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.    याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिव मनोज मिश्रा (वय १८) हा आकुर्डी येथून कासारवाडीला जाण्यासाठी पुण्याकडे जाणाºया रेल्वेगाडीत बसला. लोकलच्या डब्यातील तीन ते चार तरुण त्याच्याकडे आले. ‘‘तू आमच्या बहिणीला का छेडतोस? अशी विचारणा करून ते वाद घालू लागले. शाब्दिक वाद घालत त्यांनी शिव मिश्राला पिंपरी रेल्वे स्थानकावर उतरवले. रेल्वे स्थानकावर उतरताच, त्यांनी त्यास घोळका घातला. त्याच्या जवळील मोबाइल, घड्याळ जबरदस्तीने काढून घेतले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी शिवकडून त्याच्या वडिलांचा मोबाइल क्रमांक घेतला. त्यांच्याशी संपर्क साधून तातडीने तीन हजार रुपये घेऊन रेल्वे स्थानकावर येण्यास सांगितले. मुलाचे अपहरण केलेल्या आरोपींनी पैशांची मागणी करताच, शिवचे वडील घाईघाईत पिंपरी रेल्वे स्थानकात आले. टोळक्याकडे त्यांनी तीन हजार रुपयांची रक्कम सोपवली. रेल्वे स्थानकावर काहीतरी गोंधळ सुरू आहे, हे लक्षात येताच प्रवाशांनी याबाबत रेल्वे पोलिसांना कळविले. मात्र शिवच्या वडिलांकडून अपेक्षित रक्कम मिळाली असल्याने टोळक्याने तेथून लगेच पळ काढला. अपहरण करून तुटपुंजी रक्कम मागणारे हे आरोपी भुरटे चोर असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. शिवाय तीन हजार रुपयांच्या मागणीसाठी तरुणाच्या वडिलांना मोबाइल करण्याचे अपहरणकर्त्यांनी धाडस दाखविले, याचा अर्थ त्यांना शिव शर्मा यांची कौंटुबिक पार्श्वभूमी माहिती असावी, मिश्रा कुटुंबीयांची माहिती असणारे, त्यांची ओळख असणाºयांपैकी कोणाचे तरी हे कृत्य असावे, असा पोलिसांना संशय आहे. पिंपरी रेल्वे स्थानकावरून लहान मुलांचे अपहरण होण्याच्या दोन घटना मागील काही वर्षांत घडल्या आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड