पिंपरी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू केलेले असतानाही नियमांचे उल्लंघन केले जात आहे. हिंजवडी आयटी पार्क परिसरात हॉटेल्स, रेस्टॉरंट, हुक्काबार, दारूचे दुकान सुरू होते. अशा १८ आस्थापना हिंजवडीपोलिसांनी मंगळवारी (दि. २५) सील केल्या आहेत. शासनाच्या आदेशाचे पालन करण्याबाबत पोलिसांनी वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. तरीही त्यांच्याकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी आस्थापना सील करणेबाबतचा प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे सादर केला. तहसीलदारांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी ही धडक कारवाई केली.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत, निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
कारवाई केलेल्या आस्थापना (पत्ता) - मोफासा हॉटेल (ऑक्सफर्ड रोड, खंडोबा मंदीर जवळ, बावधन)- हॉटेल रुडलाऊंज (हिंजवडी)- हॉटेल ठेका रेस्टो अँड लॉज (भुमकर चौक ते हिंजवडी रोड, हिंजवडी)- हॉटेल अशोका बार अँड रेस्टो (जयरामनगर, शिवाजी चौक, हिंजवडी)- हॉटेल बॉटमअप (भटेवरा नगर, हिंजवडी)- श्री चायनिज अँड तंदुर पॉईंट (माण)- महाराष्ट्र हॉटेल भोजनालय, चायनिज (बुचडेवस्ती, मारुंजी)- हॉटेल शिवराज (पुनावळे)- कविता चायनिज सेंटर (शिवार वस्ती, मारुंजी)- हॉटेल पुणेरी (बावधन)- हॉटेल आस्वाद (इंदिरा कॉलेजजवळ, हिंजवडी)- हॉटेल ग्रीनपार्क स्टॉट ऑन (भुंडे वस्ती, बावधन)- फॉर्च्युन डायनिंग एल.एल.पी. उर्फ ठिकाणा हॉटेल (व्हाईट स्क्वेअर बिल्डिंग, हिंजवडी)- हॉटेल टिमो, चांदणी चौक (बावधन)- वॉटर-9 मल्टीक्युझिन रेस्टॉरंट अँड लंच (बावधन खुर्द, पौड रोड, जुना जकात नाका, बावधन)- एस.पी. फॅमिली रेस्टॉरंट (हिंजवडी ते कासारसाई रोड, कासारसाई)- योगी हॉटेल (पुणे बेंगलोर हायवे शेजारी, ताथवडे)- यश करण बिअर शॉपी (हिंजवडी)