शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

हिंजवडी ते घोटावडे रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 2:26 AM

घोटावडे : आयटीनगरीस जोडणारे रस्ते असुरक्षित

हिंजवडी : मुळशी तालुक्यातील घोटावडेगाव ते आयटीपार्कला जोडणारा तीन किलोमीटरचा रस्ता वाहनचालकांसाठी अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. संबंधित रस्ते ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने कसल्याच उपाययोजना न केल्याने या रस्त्यावर अपघाताला आयते निमंत्रणच मिळत आहे. तीन किलोमीटरवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला रूंदीकरणासाठी दीड ते दोन फुटापर्यंत खोदकाम केलेले आहे. मातीच्या भरावावरून घसरून अपघात घडत आहेत.

या ठिकाणी काम सुरू असल्याचा फलक, दिशादर्शक, रिफ्लेक्टर, लाल रिबन अथवा खासकरून रात्रीच्या वेळी वाहनचालकांच्या लक्षात येईल असे सूचना फलक लावलेले नाहीत. रविवारी दुपारच्या सुमारास खोदकामाचा अंदाज न आल्याने बापूजीबुवा मंदिराच्या मागील बाजूस काही अंतरावर दुचाकी आणि मोटार यांच्यात धडक झाली. दोन्ही वाहने पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला पडली होती. यामध्ये अक्षय लक्ष्मण खानेकर (वय २३, रा. खांबोली, ता. मुळशी) व त्याचा मित्र हे गंभीर जखमी झाले असून, खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पाटबंधारे खात्याअंतर्गत मुळशी तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ता दुरुस्ती व रुंदीकरणाची कामे जोरात सुरू आहेत. मात्र ज्या कंपनीला हे काम दिले जाते त्यांच्याकडून सर्व अटी आणि नियमांची पूर्तता केली जात आहे की नाही हे तपासण्याबाबत पाटबंधारे विभाग उदासीन आहे. ग्रामस्थांनी याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुळशी पाटबंधारे विभागाकडून पिरंगुट ते उर्से असा तब्बल ५५ किलोमीटरचे रस्ता रुंदीकरणाचे काम ‘रोड वे सोल्युशन’ या कंपनीला देण्यात आले आहे. कामाची गुणवत्ता व सुरक्षितता तपासण्यासाठी शासनाकडून स्वतंत्र अभियंता नेमण्यात आला आहे. तरीसुद्धा या रस्त्यावरील कामात सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा दिसून येत आहे. वरिष्ठांमार्फत याप्रकरणी चौकशी होणे गरजेचे आहे. अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.ठेकेदार बेफिकीर : खोदकामाचा येत नाही अंदाजपिरंगुट, उरावडे एमआयडीसी ते हिंजवडी आयटीपार्कला जोडणारा हा एकमेव महत्त्वाचा रस्ता आहे तसेच ताम्हिणी घाट मार्गे कोकणात जाण्यासाठी हा पर्यायी रस्ता असल्याने या रस्त्यावर दिवसरात्र मोठी वर्दळ असते. आगोदरच हा रस्ता अरुंद आहे त्यातच रुंदीकरणासाठी दोन्ही बाजूला खोदकाम केल्याने याठिकाणाहून जाताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून जावे लागते. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी समोरून वेगाने वाहन आल्यास रस्त्याच्या बाजूकडील खोदकामाचा अंदाज न आल्याने हमखास अपघात होतात.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad safetyरस्ते सुरक्षा