शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

हिंजवडी, वाकडसह पिंपरी शहरात खुलेआम निघतोय 'नशे'चा धूर ; आयटीयन्स, महाविद्यालयीन तरुण 'टार्गेट'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 10:26 PM

पानटपरी, झोपडपट्टी भागासह फोनद्वारे घरपोच मिळतोय गांजा..

ठळक मुद्देअगोदर ३०० रुपये सांगून त्यानंतर २०० रुपयांना गांजाची पुडी सहज उपलब्ध

पिंपरी : एका बाजूला पोलिसांकडून शहरात विक्री होणाऱ्या गांजा तसेच नशेच्या व अमली पदार्थांच्या विक्रीवर कारवाई होत आहे. मात्र, पोलीस कारवाईला न जुमानता हिंजवडी, वाकड, निगडी, पिंपरी, भोसरी, आळंदी व चाकण भागात गांज्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे 'लोकमत'ने केलेल्या 'स्टिंग ऑपरेशन' मध्ये दिसून आले. वाकड व ताथवडे येथील महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि हिंजवडीतील आयटीयन्स तरुणांना त्यासाठी लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे.

हिंजवडीतील मुख्य चौकापासून काही अंतरावर असलेल्या एका दुकानामागील पानाच्या टपरीतून संबंधित व्यक्तीचा संपर्क नंबर दिला जातो. त्यानंतर वाकड परिसरातील काळाखडक झोपडपट्टी भागातील काही ठिकाणी महिलांच्या माध्यमातून गांजाची विक्री होत आहे. या परिसरातील एका पानटपरीत जाऊन हिरवा माल, पुडी, भमभम भोलेनाथ असे कोडवर्ड सांगायचा. त्यानंतर पानटपरी चालकाकडून झोपडपट्टीतील कोणाशी संपर्क साधावा किंवा घरपोच मिळण्यासाठी काही जणांचे नंबर दिले जातात. 

दरम्यान, लोकमत प्रतिनिधीने वाकड भागातील काळाखडक झोपडपट्टी भागात जाऊन शनिवारी सांकेतिक भाषेत पुडी मिळेल असे विचारले. त्यानंतर अगोदर ३०० रुपये सांगून त्यानंतर २०० रुपयांना गांजाची पुडी सहज उपलब्ध झाली. त्यानंतर हिंजवडी भागातील एका पानटपरीवर नीलेश नावाच्या एकाचा मोबाइल नंबर देण्यात आला. या नंबरवर संपर्क केला असता, भैया कितना चाहिऐ बेलो, घरपोच देंगे, असे सांगून पुडीच्या आकारानुसार ५०० ते १००० रुपये सांगितले. पोलिसांची काही अडचण येईल का, असे विचारल्यानंतर काही अडचण नसल्याचे बिनधास्तपणे संबंधित व्यक्तीने सांगितले. हे रेकॉर्डिंग अमली पदार्थ विरोधी पथकाकडे लोकमत प्रतिनिधीने पाठविले आहे.----------------वसुली पंटर नामानिराळेआपल्या पोलीस स्टेशनच्या भागात कोणत्या ठिकाणी गांज्यासारख्या नशेच्या पदार्थांची विक्री होते. याची माहिती संबंधित स्टेशनमधील वसुली पंटर म्हणून जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्याकडे असते. अनेकदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व इतर कर्मचारी यांची बदली होते. मात्र वसुली पंटर अनेक वर्षांपासून स्टेशनला तळ ठोकून आहेत. त्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्याकडून कारवाईचा फार्स केला जातो. कोणावर कारवाई दाखवायची आणि कोणावर नाही, हे वसुली पंटर ठरवित असल्याची माहिती सूत्राने दिली.----------------प्रतिनिधी आणि एजंट यांच्यामधील संवादप्रतिनिधी : हॅलो भैय्या पुडी होना थाएजंट : हा मिलेगी ना, कहा पे होना बोलो, तुम जहा बोलेंगे वहा पे लाके दुंगाप्रतिनिधी : पोलीस की कोई दिक्कत नही आयेंगी नाएजंट : कोई दिक्कत नही आयेगी, अपना काम प्रायव्हेट है, कोई टपरी थोडी है अपनीप्रतिनिधी : पैसे कितने देने पडेंगेएजंट : जितनी बडी पुडी उतने पैसे, ५००, ७००, १००० तक की पुडी मिलेगी.प्रतिनिधी : ठीक है, मै मेरे दोस्त को पुछके बताताएजंट : जल्दी बोलो मै अभी पुडी देने जा रहा हू, पैसे कल-परसो दिये तो भी चलेगा अपने पास सब कॉलेज के लडके आते हैहो रेकॉर्डिंग ऐकले. पिंपरी - चिंचवड परिसरात अमली पदार्थ तस्करीवर कारवाई सुरू आहे. ती अधिक प्रभावी केली आहे. त्याच्या समूळ उच्चाटनासाठी पोलीस यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत.- श्रीराम पौळ, पोलीस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक, पिंपरी-चिंचवड---------------------------शहरात कुठे व कोण आहे एजंटहिंजवडी : चोरगे, महाडिकवाकड : नीलेशताथवडे : पानटपरीनिगडी : रफीक, पवारचाकण : स्थानिक नागरिक---------------------

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDrugsअमली पदार्थITमाहिती तंत्रज्ञानPoliceपोलिसSmokingधूम्रपान