शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

तळेगावचा इतिहास होणार ग्रंथबद्ध

By admin | Published: March 29, 2017 1:59 AM

तळेगाव दाभाडे इतिहास ग्रंथनिर्मिती समितीच्या वतीने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्रंथनिर्मिती शुभारंभ करण्यात आला

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे इतिहास ग्रंथनिर्मिती समितीच्या वतीने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्रंथनिर्मिती शुभारंभ करण्यात आला.तळेगावच्या दाभाडे राजघराण्यातील माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे, उमाराजे दाभाडे, याज्ञसेनीराजे दाभाडे, संध्याराजे दाभाडे, ग्रंथनिर्मिती समितीचे अध्यक्ष व माजी आमदार कृष्णराव भेगडे, स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभूळकर, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, बापूसाहेब भेगडे, समितीचे उपाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, मुख्य संपादक सुरेश साखवळकर, कार्यकारी संपादक प्रा. जयंत जोर्वेकर, सचिव वसंतराव भेगडे आदी उपस्थित होते. या वेळी ‘तळेगावचा इतिहास’ या विषयावर इतिहासाचे अभ्यासक डॉ. प्रमोद बोराडे यांचे व्याख्यान झाले. सुरेश साखवळकर प्रास्ताविकात म्हणाले की, समग्र तळेगावचा इतिहास हा संकल्प कृष्णराव भेगडे यांच्या मनात येणे हा दैवी संकेत म्हणावा लागेल. तळेगावचा इतिहास रोमहर्षक व प्रेरणादायी आहे. त्यामुळे या ग्रंथासाठी १० विषय समित्या नेमल्या असून, तळेगावचे सर्व क्षेत्रांतील माहात्म्य या ग्रंथाच्या माध्यमातून जगापुढे येईल.तळेगावचा मनोरंजक, रोमहर्षक इतिहास जगापुढे ठेवण्यासाठी हा ग्रंथनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येत आहे. दाभाडे घराण्याचा कार्यकाल, स्वातंत्र्यपूर्व कालखंड व नंतरचा कालखंड याचा आढावा आम्ही घेत आहोत. तळेगाव काल, आज, उद्या असे ग्रंथाचे स्वरूप राहील. गावातील विविध क्षेत्रांतील संस्था, व्यक्तींचे योगदान याचा आढावा घेण्याचा प्रयत्न राहील. नव्या पिढीचे जीवन घडविण्यासाठी हा ग्रंथ उपयुक्त ठरेल. पहिले तीन महिने माहिती संकलन करून एक वर्षात ग्रंथ प्रकाशन केले जाणार आहे. सर्वांच्या सहभागातून हा प्रकल्प साकारणार आहे. प्रत्येक घरात हा ग्रंथ संग्रही राहिला पाहिजे. नव्या विकसित तळेगावच्या दृष्टीने व्हीजन या ग्रंथाच्या निमित्ताने शब्दबद्ध होणार आहे.पुढच्या पाडव्यापर्यंत ग्रंथ प्रकाशित करण्याचा प्रयत्न राहील. महाराष्ट्रात प्रमाणभूत ग्रंथ ठरेल. इतर शहरे या ग्रंथापासून प्रेरणा घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.खंडेराव दाभाडे यांना सरसेनापतिपद मिळून ३०० वर्षे पूर्ण झाली. त्याच वर्षी ही ग्रंथनिर्मिती होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. सर्वांनी या ग्रंथनिर्मितीत योगदान देऊन सहकार्य करावे, असे आवाहन याज्ञसेनीराजे दाभाडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जोर्वेकर यांनी केले. (वार्ताहर)