पिंपरी : शहरातील एमआयडीसीच्या सुमारे १०० एकर जागेवर १८ झोपडपट्टया आहेत. या सर्व झोपडपट्टींचे पुनर्वसन एमआयडीसीने विकसित करावे, याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सकारात्कता दर्शवून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी हा विषय पाठविला आहे, अशी माहिती पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी दिली.एमआयडीसीच्या जागेवरील झोपडपट्टयांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात मुंबईत गुरुवारी बैठक झाली. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख, कार्यकारी अभियंता एस. एस. मलाबादे, सहायक अभियंता एन. डी. विंचुरकर उपस्थित होते.बैठकीविषयी चाबुकस्वार म्हणाले, ‘‘एमआयडीसी प्रश्नाबाबत बैठक झाली. झोपडपट्ट्यांमध्ये महापालिकेने पाणी व रस्ते या सुविधा येथे दिल्या आहेत. संबंधित झोपडपट्टया एमआयडीसीच्या जागेवर आहेत. त्यामुळे एमआयडीसीनेच त्यांच्या पुनर्वसनाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. उद्योगमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवड मधल्या या पुनवर्सन समस्येवर तोडगा काढण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे नियम व अटी कायम ठेवून स्वत:च ते विकसित करू, असा निर्णय घेतला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे हा विषय तत्काळ मान्यतेसाठी पाठविला आहे.’’एमआयडीसीच्या जागेतील झोपड्या१३ घोषित आणि पाच अघोषित झोपडपट्ट्या एमआयडीसीच्या ३५ हेक्टर १३ घोषित व ५ अघोषित झोपडपट्टया आहेत. त्यामध्ये दत्तनगर, विद्यानगर, रामनगर, अजंठानगर, काळभोरनगर (आकुर्डी), आंबेडकर नगर (थरमॅक्स चौक), शांतीनगर (भोसरी), महात्मा फुलेनगर (मोहननगर), अण्णासाहेब मगर नगर (चिंचवड), महात्मा फुलेनगर, गवळीनगर वसाहत, बालाजीनगर, लांडेवाडी (भोसरी), गणेशनगर, मोरवाडी, इंदिरानगर (चिंचवड) या झोपडपट्टया आहेत.
एमआयडीसीकडून झोपड्यांचे पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 3:04 AM