पिंपरी : महापालिकेच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते करण्यात आला. महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती समीर मासूळकर, नगरसदस्य अनंत कोऱ्हाळे, नगरसदस्या विमल जगताप, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, क्रीडा पर्यवेक्षक राजू कोतवाल, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी, प्रवीण बागलाणे, आकाश चव्हाण आदी उपस्थित होते. शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सत्कारार्थींमध्ये चंद्रशेखर कदम, महेश कुडले, शाकीर शेख, इनायत शेख, सुशील भोसले, सीमा कुलकर्णी, चेतन मुठाळ, प्रथम भुजबळ, वेदान्त भरेकर, आफताब शिकलगार, हृषिकेश सोनावले, सोहम उजगावकर, अर्ष शिकलगार, शिवराज गावडे, मनीषा चौधरी, साक्षी देशपांडे, आयशा शेख, सोनल साळुंखे, जान्हवी वर्मा, ऐश्वर्या नवले, सीमा जाधव, शीतल पोळ, साहिल गुंड, दत्तात्रय काळे, शुभम जाधव, विशाल मल्होत्रा, राकेश उत्तेकर, संतोष पातले, प्रणाली सूर्यवंशी, अमन मुल्ला, सौरभ नवले, विनायक कदम, रोहित हाडके, तृप्ती निंबळे, धनश्री पाटील, परमानंद राम, जमीर शिकलगार यांचा समावेश होता.चंद्रशेखर कदम हे मनपाच्या माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी तीन खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त केले आहे.कुडले, शाकीर शेख, इनायत शेख, सुशील भोसले, सीमा कुलकर्णी यांनी मॅरेथान चित्रपट वास्तविक जीवनातील अपंगांना घेऊन पूर्ण केला.चेतन मुठाळने राष्ट्रीय स्तरावर किक बॉक्सिंगमध्ये तिसरा क्रमांक व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळवून यश मिळवले आहे. भुजबळने निगडी येथे झालेल्या लॉन टेनिस स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. भरेकर याने श्रीलंका येथे झालेल्या ज्युडो-कराटे स्पर्धेत सुवर्ण व रजत पदक प्राप्त केले. (प्रतिनिधी)
उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान
By admin | Published: January 09, 2017 2:51 AM