पिंपरी : पोलिसांनी शहराच्या विविध भागातील हुक्का पार्लरवर कारवाई केली. हुक्का पार्लर तसेच हॉटेल स्वरूपात सुरू असलेल्या अड्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे ४५ जणांना समजपत्र दिली, १४ जणांना अटक करण्यात आली. अशा स्वरूपाच्या कारवाई कधी तरी होतात, पानटपऱ्यांवर हुक्का विक्री मात्र राजरोसपणे सुरू आहे. शनिवारी, रविवारी पान टपऱ्यांवर हुक्का खरेदीसाठी येणाऱ्यांमध्ये महाविद्यालयीन तरूणींचे प्रमाण अधिक आहे. पिंपरी चिंचवडमधील विविध ठिकाणच्या टपऱ्यांवर हुक्काचे साहित्य मोठ्या प्रमाणावर विक्रीस ठेवल्याचे दिसून येते. तंबाखू,सिगारेट, गुटख्यापेक्षा हुक्कयासाठीचे साहित्य अधिक प्रमाणात पहावयास मिळते. शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी युवती हुक्कयाचे साहित्य घेण्यासाठी टपरीवर येतात. दुचाकी अथवा मित्रांच्या चार चाकी वाहनातुन हुक्कयाचे साहित्य घेऊन जातात. पुर्वी पान टपरीवर मुली कधीच दिसून येत नव्हत्या. अलिकडच्या काळात मुलीही पानटपरीवर सिगारेटचे झुरकेही घेताना दिसतात. पिंपरी, रावेत परिसरात शैक्षणिक संकुल आहेत. येथे परराज्यातुन शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यातील काही अशा चुकीच्या मार्गाचा अवलंब करू लागले आहेत. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लरसह अन्य प्रकारचे अवैध धंदेही जोमात सुरू आहेत. सामाजिक सुरक्षा विभागाने भोसरीत कारवाई करून वेश्या व्यवसायात सहभागी असलेल्या महिलांवर कारवाई केली. त्यांच्याकडील अल्पवयीन मुलींची सुटका केली. देहुरोड हद्दीत असे अवैध व्यवसाय सुरू आहेत. देहुरोड पोलिसांच्या पुढाकाराने अशा अवैध धंद्यांविरोधात कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. जमिन खेरदी विक्री प्रकरणांमध्ये नागरिकांची फसवणूक होत असते. देहुरोड पोलिसांकडून अशा प्रकरणांमध्ये तक्रारकर्त्यांना योग्य ते सहकार्य मिळत नाही. त्यामुळे नागरिकांनी ग्रामीण अधिक्षकांकडे तक्रार नोंदवली होती. त्याची दखल घेऊन अधिक्षकांनी आर्थिक गुन्ह्यासंबंधी तक्रारी असल्यास पोलीस ठाण्याऐवजी थेट पोलीस अधिक्षक कार्यालयाकडे नोंदवावी, असे आवाहन केले होते. (प्रतिनिधी)हुक्क्याची नोंदणी आॅनलाईनहुक्का पेन हे केवळ एक साधन आहे. द्रव्य स्वरूपात फळांचा सुगंध घेण्याची सुविधा आहे. परंतु, ज्याला जसा वापर करायचा, तसा ते करतात. टपऱ्यांमधून पेन हुक्क्याची विक्री केली जाते. पुढे त्याचा कोण कसा उपयोग करते, हे आम्ही सांगू शकत नाही. आॅनलाइन आॅर्डर नोंदवूनसुद्धा हुक्का मागवता येतो. केवळ टपऱ्यांवर अवलंबून न राहता आॅनलाइन हुक्का आॅर्डर नोंदविणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. हुक्का पेनच्या विक्रीसाठी विविध आॅनलाइन साइट्सही उपलब्ध आहेत. तेथे २५० रुपयांपासून ते अडीच हजार रुपयांपर्यंत किंमत आहे.... असा आहे पेन हुक्का तीन भागांमध्ये हे हुक्का पेन तयार केले असून, ते बॅटरीवर चालते. पेनमध्ये द्रव्य स्वरूपातील निकोटिन भरले जाऊ शकते. पेन चार्ज केल्यानंतर अॅटोमायझर तापते आणि बटन दाबल्यानंतर त्यातील द्रव सिगारेटच्या धुराप्रमाणे बाहेर पडते.
पानटपऱ्यांवर मिळतोय हुक्का
By admin | Published: March 19, 2017 4:16 AM