शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत
2
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
3
परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम
4
सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
5
जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल
6
गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा
7
‘इंडिया’चा हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग
8
तलाठी बनविताे : क्लास वन अधिकाऱ्याने 16 जणांना गंडविले
9
भारताने माघार घेतल्यास ५,७२० कोटी रुपयांचे नुकसान; पाकने घेतल्यास केवळ ६३५ कोटींचा फटका
10
शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार, ‘नाबार्ड’चे कडक निकष :  जेवढा हिस्सा तेवढाच लाभ 
11
परभणीतील घटनेच्या मागे कोण? सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा सवाल; शांततेचे आवाहन
12
बुमराह अव्वल स्थानी कायम, कसोटी क्रमवारी; फलंदाजांमध्ये ब्रूकचा दबदबा
13
एबडेनला नवा साथीदार हवा होता : रोहन बोपन्ना
14
"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा
15
घरातून ओढून नेलं अन् गळा... माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या! पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप
16
थकवा, मूड स्विंग्स... नाइट शिफ्टचा शरीरावर वाईट परिणाम; डॉक्टरांनी दिल्या ३ बेस्ट डाएट टिप्स
17
ST Bus: एसटीचा एक रुपयात १० लाखांचा विमा; जखमी प्रवाशाला किती मिळते मदत? जाणून घ्या...
18
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
19
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी
20
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'

रोहिंग्यांनी देहूरोडमध्ये बांधले घर; घुसखोरी करून १२ वर्षांपासून वास्तव्य

By नारायण बडगुजर | Published: December 11, 2024 7:30 PM

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई

पिंपरी : म्यानमारच्या दोन रोहिंग्या कुटुंबीय भारतात वास्तव्य करत असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने २७ जुलै २०२४ रोजी देहूरोड येथे कारवाई केली होती. या रोहिंग्यांनी देहूरोड येथे स्वतःचे घर बांधल्याचे उघड झाले असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.देहूरोडमध्ये राहणाऱ्या म्यानमारच्या मुजम्मिल मोहम्मद अमीन खान (वय ४३) आणि शाहीद ऊर्फ सोहिद्दुल शेख (३५) या दोघांसह त्यांच्या पत्नी, अशा चार रोहिंग्यांवर भारतात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी कारवाई केली होती. देहूरोड पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून फोन, सिमकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, बांगलादेशी चलन, भारतीय पासपोर्ट जप्त केला.शेख भाड्याच्या खोलीत, तर खान देहूरोड येथे स्वतःचे घर बांधून राहत असल्याचे समोर आले. पत्नी आणि दोन मुलींसह खान म्यानमारमध्ये राहत होता. मात्र, त्याने कुटुंबासह बांगलादेशात स्थलांतर केले. तेथे ‘रेफ्युजी कॅम्प’मध्ये काही काम न मिळाल्याने त्याने भारतात पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी केली. तेथून तो रेल्वेने पुण्यात आला आणि तळेगाव एमआयडीसीतील कंपनीत नोकरीला लागला. त्यानंतर त्याने देहूरोड येथे लहान मुलांचे कपडे विकण्यास सुरुवात केली. त्याने भिवंडी येथील एका दुकानातून कोणतेही कागदपत्र न देता ५०० रुपयांत आधारकार्ड मिळविले. त्यानंतर त्याने पत्नीचेही आधारकार्ड घेतले. त्यानंतर खान याने स्थानिक बाजारात सुपारी विकायला सुरुवात केली.भारतीय पासपाेर्टही मिळवलादेहूरोड येथील गांधीनगर परिसरात खान याने ८० हजार रुपयांत ६०० चौरस फूट जागा घेतली. या व्यवहाराची कोणतीही कागदपत्रे तयार न करता त्याने घरही बांधले. सुपारी विक्रीचे काम करताना त्याने भारतीय पासपोर्ट देखील मिळवला.

सध्या संशयित जामिनावर बाहेर आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना भारताबाहेर जाण्यास परवानगी नाही. याप्रकरणात संशयित दोषी ठरल्यास न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगल्यानंतर त्यांना न्यायालयाच्या आदेशाने भारताबाहेर त्यांच्या मायदेशी पाठविण्यात येईल. - विकास राऊत, पोलिस निरीक्षक, दहशतवाद विरोधी शाखा, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालयPuneपुणेRohingyaरोहिंग्या