पिंपरी : शहरात सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पक्षाची शहर कार्यकारिणीची व महापालिका पदाधिका-यांची आढावा बैठक आज झाली. यात पालकमंत्री गिरीश बापट यांनी मनमानीपणे कारभार करणा-या पदाधिका-यांचे कान उपटले.‘‘महापालिकेत दररोज काय होते, काय घडते, याची माहिती माझ्याकडे असते. दररोज वृत्तपत्र वाचतो. त्यामुळे महापालिकेत माझ्यामुळे सत्ता आल्याच्या भ्रमात राहू नका. भाजपाच्या नावाने गैरकारभार करू नये, केल्यास गय केली जाणार नाही, घरचा रस्ता दाखविला जाईल,’’ असा सज्जड इशारा त्यांनी दिला.पुणे-मुंबई महामार्गावरील एका हॉटेलमध्ये भाजपा शहर कार्यकारिणीची बैठक झाली. या वेळी पालकमंत्र्यांनी पदाधिकाºयांना सुनावले. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे होते. भाजपा राष्ट्रीय संघटनमंत्री व्ही. सतीश, महापौर नितीन काळजे, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सभागृहनेते एकनाथ पवार यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.चार मंडलाधिकारी निलंबितबैठकीस चार मंडलाधिकारी अनुपस्थित होते. याबाबत पदाधिकाºयांना भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी माहिती विचारली असता, त्यांच्याकडून माहिती मिळाली नाही. त्यामुळे चार मंडलाधिकाºयांना काढून टाका, असे निर्देश ज्येष्ठ पदाधिकाºयांनी दिले. बेशिस्तांची गय केली जाणार नाही, असेही सूचित करण्यात आले.भ्रमातून बाहेर या!पालकमंत्री बापट यांनी पदाधिकाºयांना कोल्हा व हत्तीची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, ‘‘कोल्ह्याची सावली मोठी झाली म्हणजे तो मोठा होत नाही. या गोष्टीचा मतितार्थ म्हणजे, भाजपा खूप मोठा पक्ष आहे. भाजपाची देशभरात सत्ता आहे. त्यामुळे पिंपरी महापालिकेत आपल्यामुळेच सत्ता आली, असे कोणी भ्रमात राहू नये, त्यातून बाहेर पडून कामे करा.’’
गैरकारभार करणा-यांना घरचा रस्ता, पालकमंत्र्यांचा इशारा, महापालिका पदाधिका-यांचे उपटले कान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 5:02 AM