बांधकाम मजुरासाठी घरे बांधणार, पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त करणार-अजित पवार

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: January 20, 2024 11:52 AM2024-01-20T11:52:22+5:302024-01-20T11:52:56+5:30

पिंपरी-चिंचवड शहरात बांधकाम मजुरासाठी घरे बांधण्यात येणार आहेत....

Houses will be built for construction workers, Pimpri-Chinchwad cities will be cleared of slums - Ajit Pawar | बांधकाम मजुरासाठी घरे बांधणार, पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त करणार-अजित पवार

बांधकाम मजुरासाठी घरे बांधणार, पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त करणार-अजित पवार

पिंपरी : सोलापूरला कामगारांसाठी ३६० एकरमध्ये ३० घरांचा गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्या पार्श्वभुमीवर पिंपरी-चिंचवड शहरात बांधकाम मजुरासाठी घरे बांधण्यात येणार आहेत. तसेच झोपडपट्टी मुक्त पिंपरी-चिंचवड शहर करण्याचे स्वप्न असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत महापालिकेच्या वतीने आकुर्डी व पिंपरी येथे उभारण्यात आलेल्या प्रकल्पातील लाभार्थ्यांची सदनिकांची संगणकीय सोडत शनिवारी सकाळी चिंचवडला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, नाना काटे आदी उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराचा विकास होत आहे. या शहरात मराठवाडा, विदर्भ, खान्देशातून जास्त प्रमाणात मजूर आणि कामगार काम शोधण्यासाठी येतात. त्यांना राहण्यासाठी घर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिका आणि राज्य शासनाची आहे. त्यांच्यासाठी महापालिकेने पिंपरी आणि आकुर्डी गृहप्रकल्प उभारण्यात आले. जेएनयूआरएमच्या माध्यमातून शहरात घरे बांधून दिली. शहरातील प्रत्येकाला चांगले आणि हक्काचे घर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

एजंटांना बळी पडू नका...

अजित पवार म्हणाले, ज्यांना घर मिळाले त्यांचे अभिनंदन ज्यांना घरे मिळाली नाहीत. त्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करा. तसेच ज्या लाभार्थ्यांना घरे मिळाली आहेत. त्यांना वेळेत घर महापालिकडून देण्यात यावे, त्यात दिरंगाई करू नका असा सल्ला शेखर सिंह यांना अजित पवार यांनी दिला. तसेच ज्यांना घरे मिळाली नाहीत त्यांनी जे कोणी पैसे घेवून घरे मिळवून देतो, असे सांगतो त्या एजंटांना बळी पडू नका असे आवाहनही पवार यांनी केले.

९३८ घरांची सोडत...

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने आकुर्डी व पिंपरी येथे स्वस्त घरकुल योजना प्रकल्प राबविण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये आकुर्डी येथे ५६८ तर पिंपरी येथे ३७० अशा एकूण ९३८ सदनिका आहेत. आकुर्डी प्रकल्पाकरिता ६६७२ अर्ज व पिंपरी प्रकल्पाकरिता ४६१५ असे एकुण ११२८७ अर्ज प्राप्त झाले होते.

Web Title: Houses will be built for construction workers, Pimpri-Chinchwad cities will be cleared of slums - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.