शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वाहनातून प्रवास करताना चालकाची मानसिक स्थिती कशी समजणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 1:33 PM

वाहन चालविणारा मानसिक अथवा शारीरिकदृष्ट्या अयोग्य असल्यास त्याचा इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो...

- नारायण बडगुजर 

पिंपरी : टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. वाहन चालविणारा मानसिक अथवा शारीरिकदृष्ट्या अयोग्य असल्यास त्याचा इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वाहनातून प्रवास करताना चालकाची मानसिक स्थिती लक्षात येणे गरजेचे आहे. अन्यथा हा प्रवास आपल्यासह इतरांच्याही जीवावर बेतू शकतो. त्यादृष्टीने वाहनातील सहप्रवाशांनी चालकाच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात किरकोळ तसेच प्राणांतिक अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघात रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाईसह उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, याबाबत वाहनचालक तसेच नागरिकांनीही पुढाकार घेतला पाहिजे. आपल्यामुळे इतरांचा जीव जाऊ नये, यासाठी वाहन चालकाने काळजी घ्यावी. शारीरिक व मानसिकदृष्ट्या थकवा आला असल्यास किंवा राग, ताण-तणाव असेल तर वाहन चालवू नये. मानसिक अथवा शारीरिकदृष्ट्या वाहन चालविण्यास अयोग्य असलेल्या व्यक्तीने वाहन चालविल्यास एक ते दोन हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. मात्र, चालकाची मानसिकता पोलिसांना कशी समजणार हाही प्रश्‍न आहे. त्यामुळे सहप्रवाशांनीच चालकाची मानसिकता ओळखून प्रवास करणे गरजेचे आहे.  

चालकाची मानसिक, शारीरिक स्थिती अयोग्य असल्यास दंड

पहिल्यांदा अशाप्रकारे आढळल्यास संबंधित चालकावर एक हजार रुपये आणि असाच प्रकार दुसर्‍यांदा आढळल्यास दोन हजार रुपयांच्या दंडाची तरतूद कायद्यामध्ये आहे. मुळात चालकाची मानसिकता लक्षात येणे कठीण आहे. त्यामुळे असा दंड कसा करावा किंवा संबंधित चालक ‘त्या’ अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले तरच दंड लावता येऊ शकतो.  

मानसिक स्थिती समजणे कठीणच

चालकाची मानसिक स्थिती ही केवळ वाहनात सहप्रवाशांना समजू शकते. तसेच चालकाच्या घरातील सदस्यांना याबाबत माहिती असू शकते. मानसिक स्थिती अयोग्य असल्यास चालकाला वाहन चालविण्यास देऊ नये, हा नियम कटाक्षाने पाळला पाहिजे.

कुटुंबातील सदस्यांना आपल्या घरातील व्यक्‍तीची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. विशेषत: वाहन चालविण्यापूर्वी कोणताही ताणतणाव वाहन चालकावर नसावा तसेच संबंधित विभागांनी केवळ वैद्यकीय परीक्षा न घेता त्याबाबत मानसिकदृष्ट्या चालक संतुलित आहे की नाही, याचीही तपासणी करावी. पुरेशी झोप झाल्याशिवाय वाहन चालवू नये.  

- डॉ. मनजित संत्रे, मानसोपचार तज्ज्ञ  

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड