शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

धावत्या युगात हरवतेय माणुसकी, मदतीपेक्षा चित्रीकरणावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 4:15 AM

वेळ दुपारी साडेतीनची. आंबेडकर चौकात गर्दी जमलेली... वाहतूक पोलीस वाहनांना हात करून वाहन थांबवत होता. बाजूला एक व्यक्ती निपचित पडलेली.. बोटावर मोजण्याइतक्या व्यक्ती त्या व्यक्तीजवळ थांबलेल्या.

पिंपरी : वेळ दुपारी साडेतीनची. आंबेडकर चौकात गर्दी जमलेली... वाहतूक पोलीस वाहनांना हात करून वाहन थांबवत होता. बाजूला एक व्यक्ती निपचित पडलेली.. बोटावर मोजण्याइतक्या व्यक्ती त्या व्यक्तीजवळ थांबलेल्या. बाकी सर्वच जण आपल्याला काहीच देणे-घेणे नाही याप्रमाणे बाजू देऊन चालले. ही एखाद्या चित्रपटाला साजेसे चित्र वाटेल, पण ही सत्यघटना आहे. धावत्या युगात माणसुकी हरवत चालल्याचा प्रत्ययच या घटनेमुळे येत होता.येथील आंबेडकर चौकामध्ये एक व्यक्ती दुचाकीवरून खाली पडली. त्याच्या डोक्याला आणि डोळ्याला प्रचंड मार लागलेला होता. त्याच्या शरीरातून रक्त वाहत होते. पलीकडच्या बाजूला रुग्णवाहिका होती. ती अपघातग्रस्ताच्या जवळ आणण्याचा आटापिटा वाहतूक पोलीस करीत होता. पण त्यातही अनेक जण वाहन दामटत होते. अखेर काही कार्यकर्त्यांच्या मदतीने रुग्णवाहिकेला रस्ता रिकामा केला. पण रुग्णवाहिकाचालकाने गाडीत आधीच पेशंट आहे, असे सांगून रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला घेण्यास नकार दिला. वाहतूक पोलीस आणि काही कार्यकर्त्यांनी जखमींना रिक्षात बसविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी अनेक जण मदत करण्याऐवजी मोबाइलमध्ये छबी टिपण्यात मग्न होते. काही वेळात वाहतूक विभागाचे अधिकारी दाखल झाले. वॉर्डनच्या मदतीने गाडीवरून खाली पडलेल्या व्यक्तीला रुग्णालयात पाठविले.शहर परिसरात अशा घटना घडल्या, की त्या घटनेचे शूटिंग करणे, त्याची व्हिडीओ क्लिप काढणे, ती सोशल मीडियावर टाकणे असा ट्रेंड निर्माण होत आहे. घटना घडली, की मदत करण्याची माणसुकी हरपत चालल्याचे चित्र दिसत आहे.नियमांचे उल्लंघनपिंपरीतील आंबेडकर चौकाकडून मुंबईकडे जाण्याच्या रस्त्यावर येताना वाहनचालक सर्कलला वळसा घालून येत नाहीत. सर्रासपणे शॉर्टकटचा वापर करतात. आधीच बीआरटीमुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी किरकोळ अपघात होत आहेत. नियम मोडणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड