पिंपरी : एकाच छताखाली पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील प्रॉपर्टीचे पर्याय नागरिकांना उपलब्ध व्हावेत, यासाठी ‘लोकमत’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस २०१७’ या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांची तुडुंब गर्दी झाली होती. स्वप्नातील घराचे बुकिंग केले.नोटाबंदी झाली. महारेरा, जीएसटी आली अशा कालखंडात सदनिका की भूखंड घ्यायचा, सदनिका घ्यायची असेल तर परवडेल अशा किमतीत कोठे मिळू शकेल, मनात निर्माण होणाºया शंका, प्रश्न यांची उत्तरे लोकमतच्या गृहप्रदर्शनात ग्राहकांना मिळाली. शहराच्या मध्यवर्ती व परिसरात बांधकाम व्यावसायिकांनी उभारलेल्या गृहप्रकल्पांची, वित्तसंस्था, बँकांची माहिती उपलब्ध होईल, अशी दालने या प्रदर्शनात आहेत. शेकडो गृहप्रकल्प या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. सुटीचा दिवस असल्याने सकाळी दहा वाजल्यापासूनच दिवसभर लोकांची ये-जा सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाºया पावसाने उघडीप दिली आहे. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्राहक आले होते. अनेकांनी हक्काचे घर शोधून पसंतीचा पहिलाच फ्लॅट आरक्षित केला.शहरातील गृहप्रकल्पांसह शहराबाहेर गुंतवणूक म्हणून शिरगाव, उर्से, कामशेत, हिंजवडी, मारुंजी व मावळातील भूखंड घेण्याची इच्छा व्यक्त केली. नव्याने उद्योजक होऊ इच्छिणाºयांसाठी तळेगाव आणि चाकण या औद्योगिक ठिकाणी भूखंड उपलब्ध आहेत. स्वत:चे घर साकारण्यासाठी एक, दोन, तीन गुंठ्यांचे भूखंड अल्पदरात उपलब्ध आहेत. त्याच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे आऊटडोअर पार्टनर धिरेंद्र अॅडव्हर्टायझिंग, ब्रेव्हरेट पार्टनर साई प्रसन्ना ग्रुप आहे.गुंतवणुकीचे अनेक पर्याय एकाच छताखालीगृहप्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. मोशी, चºहोली, डुडुळगाव, आळंदी, चाकण, वाकड, पिंपळे सौदागर, चिंचवड, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कान्हे फाटा या भागांत लोकांनी बुकिंगला पसंती दिली. प्रदर्शनाला हजारो लोकांनी भेट दिली. गुंतवणुकीचे अनेक पर्याय लोकांना एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने लोकांनी लोकमतचे आभार मानले. तर, मंदीच्या काळातही या प्रदर्शनास उदंड प्रतिसाद मिळाल्याने बांधकाम व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले.आजचे कार्यक्रमआनंदी वास्तू : प्रसिद्ध वास्तूतज्ज्ञ आनंद पिंपळकर यांचे सकाळी ११.३० वा. ‘सकारातत्मक जीवनशैली आणि आनंदी वास्तू’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.अंकशास्त्राचे महत्त्व : प्रसिद्ध अंकशास्त्रतज्ज्ञ श्वेता जुमानी यांचे दुपारी ३.३० वा. ‘सर्वसामान्यांना असामान्य बनविणारे अंकशास्त्र’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.लोकमतच्या वतीने आयोजित केलेल्या गृहप्रदर्शनातून शहरातील नागरिकांना स्वप्नातील घर आरक्षित करण्याची संधी उपलब्ध करून दिली. हा उपक्रम स्तुत्य आहे. - धीरेंद्र सेंगर,धिरेंद्र अॅडव्हरटायझिंग
स्वप्नातील घरकुलासाठी तुडुंब गर्दी, ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस २०१७’मध्ये शेकडो गृहप्रकल्पांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 4:39 AM