पुणे - अन्न व औषध प्रशासनाकडून परवानगी घेऊन खाण्यायोग्य बर्फ तयार केला जातो; हाच बर्फ उन्हाळ्यात विविध खाद्यपदार्थांमध्ये वापरणे आवश्यक आहे. मात्र, औद्योगिक वापरासाठी तयार झालेल्या बर्फाचा वापर खाद्यपदार्थात केला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे औद्योगिक वापरासाठी तयार केलेल्या बर्फाला विशिष्ट रंग देण्याचा विचार शासनस्तरावर सुरू आहे.उन्हाचा तडाका वाढल्यामुळे रस्त्यावर बर्फाचे गोळे, सरबत विक्रेते आणि रसवंती गृहचालकांकडून मोठ्या प्रमाणावर बर्फाचा वापर केला जातो. मागणीनुसार खाण्याच्या बर्फाचा पुरवठा होत नसल्याने काही वेळा स्वस्तामध्ये उपलब्ध होणाºया औद्योगिक वापरातील बर्फाचा उपयोग खाद्यपदार्थामध्ये केला जातो. हा बर्फ पिण्यायोग्य पाण्यामुळे तयार केलेला नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) औद्योगिक वापरासाठी वापरल्या जाणाºया बर्फाला विशिष्ट रंग देण्याबाबत विचार सुरू केला आहे. यासंदर्भात लवकरच शासनाकडून आदेश काढला जाण्याची शक्यता आहे. उन्हामुळे हैराण झालेले नागरिक थंड पेय आणि रसवंतीगृहातील पेय घेऊन तहान भागविण्याचा प्रयत्न करतात. प्रामुख्याने उसाचा रस, आईस्क्रिम, लिंबूसरबत, कैरीचे पन्हे, आदी पेयांना नागरिकांकडून चांगलीच मागणी असते. या पेयांसाठी मोठ्या प्रमाणावर खाण्यायोग्य बर्फाची आवश्यकता असते. परंतु, नियमानुसार बर्फ तयार करून त्याची विक्री करणाºया विक्रेत्यांची संख्या मर्यादित असल्याने काही वेळा उन्हाळ्यात बर्फाचा तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे बºयाच वेळा औद्योगिक वापरासाठी तयार झालेला बर्फ बाजारात आणून खाण्यायोग्य बर्फ म्हणून विकला जातो. एफडीएकडूनही उन्हाळ्यात बर्फ तपासणी मोहीम हाती घेतली जाते. परंतु, खाण्यायोग्य आणि औद्योगिक वापरासाठीचा बर्फ ओळखता यावा यासाठी एक बर्फ विशिष्ट रंगाचा असावा, असा विचार पुढे आला आहे.औद्योगिक वापरासाठी आणि खाण्यासाठीचा बर्फ सहजपणे ओळखता येत नाही. त्यामुळे औद्योगिक वापरासाठी असणाºया दूषित बर्फाचा वापर शीतपेयामध्ये होतो. परिणामी नागरिक आजारी पडतात.
भेसळ रोखण्यासाठी बर्फाला दिला जाणार रंग, एफडीएचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 3:57 AM