शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

आयडिया नेटवर्क ‘नॉट रिचेबल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 4:23 AM

आयडिया मोबाइल नेटवर्कमध्ये वारंवार व्यत्यय येत असल्याने पिंपरी-चिंचवडमधील ग्राहक त्रस्त झाले आहेत. वेळोवेळी नेटवर्क खंडित होत असल्याने ग्राहक पर्यायी सेवेचा

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : आयडिया मोबाइल नेटवर्कमध्ये वारंवार व्यत्यय येत असल्याने पिंपरी-चिंचवडमधील ग्राहक त्रस्त झाले आहेत. वेळोवेळी नेटवर्क खंडित होत असल्याने ग्राहक पर्यायी सेवेचा विचार करू लागले आहेत. मोबाइल टॉकटाईम असो की, इंटरनेट सेवा; दोन्हीमध्ये ग्राहकांना योग्य प्रकारे सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. काही कंपन्या, संस्था यांनी ग्रुप योजनेच्या लाभासाठी आयडियाच्या सेवेचा पर्याय स्वीकारला आहे. अशा संस्था, कंपन्यांच्या प्रतिनिधींना त्यांच्या ग्रुपमध्येही संवाद साधण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. ज्या उद्देशाने त्यांनी ग्रुप कनेक्शन योजनेला पसंती दिली, त्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. मोबाइल कंपन्यांमध्ये कमी शुल्कात अधिकाधिक सेवा देण्याची स्पर्धा लागली आहे. मोबाइल ही काळाची गरज बनली आहे. अनेक कामे मोबाइलवर केली जातात. व्यावसायिक, शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनासुद्धा मोबाइलवर त्यांची कार्यालयीन कामे करण्याची सवय लागली आहे. मोबाइल सेवेवर अवलंबून असलेल्यांना आयडियाच्या सेवेत वेळोवेळी येणारा व्यत्यय त्रासदायक ठरू लागला आहे. त्यांच्या सेवेबद्दल ग्राहक असमाधानी आहेत. सेवेत काही कारणास्तव व्यत्यय येत असेल तर त्याबद्दल ग्राहकांना नोटिफिकेशनही दिले जात नाही. ग्राहकांनी संपर्क साधल्यास त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये आणखी नाराजी पसरली आहे. आयडिया कंपनीने त्रुटी दूर करावी, अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे.दिवसभरात दर पंधरा ते अर्धा तासला नेटवर्क खंडित होते. कोणाशी संवाद साधता येत नाही. अन्य कोणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास ‘नॉट रिचेबल’ असे उत्तर त्यांना मिळते. यंत्रणा कोलमडू लागल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. संवाद साधता येत नाही, तर इंटरनेट सेवेवर अवलंबून असणाऱ्या ई मेल, सोशल मीडियावरील माहिती उपलब्ध होणे ही तर दूरची बाब मानली जात आहे.