लोकमत न्यूज नेटवर्कमोशी : लाखो रुपये खर्च करून प्रसंगी व्याजाने पैसे काढून उभा केलेला डीजेचा संच सिझनमध्ये बंद राहत असल्याने या डीजे चालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे़उद्योग नगरीलाही या बंदीची झळ बसणार असून, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वाधिक डीजे व्यावसायिक असलेल्या मोशी येथील तरुणांवर रोजगाराचाच प्रश्न उभा राहणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात जवळपास ४०० ते ५०० डीजे व्यावसायिक असून एका डीजे गाडीवर ६ मुलांचा उदरनिर्वाह सुरू असतो पाच वर्षांपूर्वी डीजे ला विशेष अशी मागणी होती. व्यासायिक कर्ज व व्याजाने पैसे घेऊन, शेत जमीन विकून आलेल्या पैशातून हा व्यवसाय करण्याकडे ओढा वाढला. शासकीय बंदी आणि वाढती व्यावसायिक स्पर्धा यामुळे या व्यावसायाचा आज आर्थिक कणाच मोडला असून केलेली गुंतवणूकच वसूल होणे अवघड झाले असल्याने निव्वळ नफा ही या व्यवसायातून मिळताना दिसत नाही. त्यात डीजे व्यावसायिक संघटित नसल्याने त्यांचा बंदी विरोधातील आवाजही दबला जात आहे. एका डीजे संचावर पाच ते दहा मुले काम करत असतात त्यांच्या रोजगारचा प्रश्न ही बंदीमुळे उभा राहिला असून त्यांनाही बेरोजगार राहण्याची वेळ येणार आहे. त्यात डीजे बंदी असतानाही चालविल्यास चालक व मालका सह संबंधित विवाह सोहळ्यातील आयोजकांवरही गुन्हे दाखल होत असल्याने बंदी विरोधात जावून कोणीच डीजे लावण्यास तयार होत नाही.
डीजेचा आवाज आला तर शपथ
By admin | Published: May 13, 2017 4:38 AM