शरद पवारांबद्दल बोलाल तर विधानसभेस फटका बसेल; चक्क अजित पवार गटाच्या नेत्यांचा इशारा

By विश्वास मोरे | Published: July 22, 2024 07:14 PM2024-07-22T19:14:12+5:302024-07-22T19:16:09+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील कार्यक्रमात भटकती आत्मा अशी टीका केल्यानंतर त्याचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत उमटले होते

If you talk about Sharad Pawar the Assembly will suffer The warning of the leaders of Ajit Pawar group | शरद पवारांबद्दल बोलाल तर विधानसभेस फटका बसेल; चक्क अजित पवार गटाच्या नेत्यांचा इशारा

शरद पवारांबद्दल बोलाल तर विधानसभेस फटका बसेल; चक्क अजित पवार गटाच्या नेत्यांचा इशारा

पिंपरी : 'शरद पवार (Sharad Pawar) भ्रष्टाचारांचे सरदार आहेत, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पुण्यात केली.  त्याचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटले आहेत. 'शरद पवाराबद्दल बोलाल तर येत्या विधानसभेस फटका बसेल, त्याच्याबद्दल बोलू नका, आमच्या नेत्यावर टीका करणे चुकीचे आहे, असे उत्तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar) माजी आमदार विलास लांडे यांनी दिले. भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीला लांडे यांनी पत्र लिहिले आहे.

पुण्यातील बालेवाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती, पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत, अशी टीका केली.  त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाली आहेत. त्यास  भोसरीचे माजी आमदार, अजित पवार गटाचे नेते विलास लांडे यांनी उत्तर दिले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले आहे. 

विलास लांडे म्हणाले, ''आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असे वाटते की, या पद्धतीने बोलणं योग्य नाही. ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील कार्यक्रमात भटकती आत्मा अशी टीका केली होती. या विधानाचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत उमटले आहेत. भाजपने याबाबत चूक सुधारणे महत्त्वाचे आहे. मला वाटते शरद पवारांच्या बाबतीत जास्त बोलू नये आणि बोलले तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्याचा फटका बसू शकेल. खरे तर मला व्यक्तीद्वेष नाही. मात्र, शरद पवार आमचे दैवत मानतो. ८४ वर्षांच्या व्यक्तीवर बोलू नये. 

आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असे वाटते की या पद्धतीने बोलणं योग्य नाही ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी पुण्यातील भटकती आत्मा शरद पवार हे भटकते आत्मा आहेत असे म्हटले होते. या विधानाचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत उमटले आहेत. भारतीय जनता पार्टीने याबाबत चूक सुधारणे महत्त्वाचे आहे महत्त्वाची वाटते शरद पवारांच्या बाबतीत जास्त बोलू नये आणि बोलले तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्याचा फटका बसू शकेल. मला व्यक्तीद्वेष नाही. मात्र शरद पवार साहेबांना आम्ही आमचे दैवत मानतो त्यांच्यावर टीका होत असेल तर ८४ वर्षांची असणारे शरद पवार यांच्या विषयी बोलू नये याविषयी मी केंद्रीय भाजपाच्या केंद्रीय कार्यकारणीला पत्र लिहिणार आहे. गृहमंत्री अमित शाह हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अशा प्रकारची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आवडणार नाही. नेत्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी शरद पवार आणि अजित पवार हे दोन्हीही नेते महत्त्वाचे आहेत त्यांनी. महाराष्ट्रात योगदान दिले आहे त्यांनी महाराष्ट्रात योगदान दिले आहे आणि त्यांच्यामुळेच आमच्यासारखे कार्यकर्ते मोठे झाले आहेत. याबाबत आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहिणार आहे.

Web Title: If you talk about Sharad Pawar the Assembly will suffer The warning of the leaders of Ajit Pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.