पिंपरी : तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. तसेच तिला धमकी दिली. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. कुदळवाडी, चिखली येथे फेब्रुवारी २०२२ मध्ये ही घटना घडली. अजिंक्य विकास पाटील (वय २७, रा. चिखली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी १६ वर्षीय पीडित मुलीच्या आईने १७ जुलै रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील एक वर्षांपासून आरोपी फिर्यादीच्या मुलीकडे पाहून येता-जाता हसत असे. फिर्यादीच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आरोपी फिर्यादीच्या घरी आला. त्याने फिर्यादीच्या मुलीस प्रेमाची मागणी घातली. मात्र मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये फिर्यादीची मुलगी घरात एकटी असताना आरोपी घरात आला. त्याने फिर्यादीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. घडलेल्या प्रकाराबाबत आई, वडिलांना सांगितले तर तुला बघून घेतो, अशी आरोपीने धमकी दिली. पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार उघडकीस आला.