पिंपरी : महापालिका भवन येथे शहरातील विविध प्रलंबित विकासकामांबाबत आढावा बैठक झाली. त्यात इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या मुद्यावर चर्चा झाली. महापालिका प्रशासनाने गांभीर्याने कार्यवाही करावी. पर्यावरण संवर्धन आणि नदी पुनरुज्जीवन यासह प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘कालबद्ध’ उपाययोजना कराव्यात. तसेच, प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशा करण्यात आल्या.
पिंपरी- चिंचवड शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या इंद्रायणी नदी प्रदूषणबाबत 'लोकमत'ने वृत्त मालिका केली तसेच गेल्या दहा दिवसापासून नदी फेसाळत आहे. याबाबत आवाज उठविला आहे. त्या अनुषंगाने महापालिकेतील बैठकीस आमदार महेश लांडगे, आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजय खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियानात मकरंद निकम, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, श्रीकांत सवणे, रामदास तांबे, मनोज सेठिया आदी उपस्थित होते.
नदी प्रदूषणाबाबत जिल्हा प्रशासन, एमआयडीसी, नगरपालिका, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महापालिका लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे. नदी प्रदूषणाची कारणे, प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, किती नाले नदीला जावून मिळतात? त्यावर प्रशासन काय कार्यवाही करणार आहे? अशा विविध मुद्यांवर प्रशासनाने भूमिका मांडावी, अशीही चर्चा झाली. प्रदूषण नियंत्रण महामंडळास प्रदूषणाबत माहिती द्यावी, अशीही सूचना केली. आमदार महेश लांडगे म्हणाले, इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या मुद्यावर महापालिका प्रशासनाने गांभीर्याने कार्यवाही करावी. पर्यावरण संवर्धन आणि नदी पुनरुज्जीवन यासह प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘कालबद्ध’ उपाययोजना कराव्यात. तसेच, प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कामे तातडीने हाती घ्यावीत. आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील प्रदूषित पाणी नदीमध्ये न मिसळण्यासाठी तळवडे, चिखली, डुडूळगाव, दिघी, सीएमई हद्दीत भोसरी येथे एकूण ९५ एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करणे प्रस्तावित आहे. यासह चऱ्होली येथे ४१ एमएलडी, कुदळवाडी येथे ३ एमएलडी काम पूर्ण झाले आहे. रिव्हर रेसिडेन्सी येथील १२ एमएलडी प्रकल्पांचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे.'' त्यावर आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका नदी प्रदूषणाबाबत करीत असलेल्या उपायोजनाची माहिती दिली. पावन, मुळा आणि इंद्रायणी नदीच्या नदीसुधार आराखड्याची माहिती दिली.