व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस, पुणे येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूकीच्या कामकाजाची व तयारीची आढावा बैठक सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचीव शेखर चन्ने, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे, आयकर विभागाचे अतिरिक्त संचालक के.के.ओझा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मो. सु. वर्धे, महानगरपालिका निवडणूक सहआयुक्त डॉ. यशवंत माने, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, सहा.आयुक्त डॉ. यशवंतराव माने, अचारसंहीता कक्षप्रमुख सुरेश जाधव, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, शिरीष पोरेड्डी, सहायक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक सर्व सुविधा देवून आदर्श मतदान केंद्रे स्थापन करावीत व उमेदवारांनी दाखल केलेले शपथपत्र व त्यातील माहितीचे फ्लेक्स संबंधित मतदान केंद्रांवर लावावेत. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदार जनजागृतीवर भर द्यावा. विद्यापीठे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा या कामी सहभाग घेण्यात यावा. सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार जनजागृतीचे फ्लेक्स लावावेत, असे सांगून सहारिया यांनी कायदा व सुव्यस्थेचाही आढावा घेतला. मतदार जागृती करताना मतदानाचे प्रमाण वाढविण्याबरोबरच वस्तु अथवा पैशाच्या स्वरुपातील प्रलोभनाला आळा घालणे, अवैध दारु वाटपावर नजर ठेवा. मतदारांमध्ये विश्वास निर्माण व्हावा व त्यांच्यावर उमेदवारांकडून दबाव टाकला जाणार नाही, यासाठी अधिकाºयांनी दक्ष रहावे.’’
वाघमारे म्हणाले, ‘‘महानगरपालिका निवडणूकीसाठी साडेपाच हजार आॅनलाईन नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. तर प्रत्यक्ष रित्या दोन हजार तीनशे नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. वैध उमेदवारांची संख्या सव्वा२हजार आहे. आदर्श अचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी ७४ पथके स्थापन केली. मतदान जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.’’
निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंतराव माने यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी आभार मानले.(वार्ताहर)
निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सर्व यंत्रणांनी करावी. निवडणूका शांततेत आणि निर्भिड वातावरणात पार पाडण्यासाठी भरारी पथके, आचारसंहिता कक्ष, निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष, चेकपोस्ट कक्षाने आपापल्या जबाबदा?्या चोख व प्रभावीपणे पार पाडाव्यात. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जागृती करावी. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांबाबत पोलीस विभागाने दक्ष रहावे. जिल्हयात येणारी खाजगी विमाने आणि हेलिकॉप्टर्स यांच्यावर लक्ष ठेवावे.