शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

गावकी-भावकीपेक्षा खर्चालाच महत्त्व?

By admin | Published: February 17, 2017 4:49 AM

या वेळेस सोमाटणे गणातील पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक पचरंगी होणार असल्याने प्रबळ उमेदवार आपापली ताकत

उर्से : या वेळेस सोमाटणे गणातील पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक पचरंगी होणार असल्याने प्रबळ उमेदवार आपापली ताकत लावून प्रचाराला लागले आहेत. थोडेच दिवस बाकी राहिल्याने येथील राजकारण चांगलेच तापू लागले.सर्वसाधारण वर्गासाठी असल्याने सोमाटणे गणातील लढतीकडे तालुक्याचे लक्ष असणार आहे. सर्व पक्षश्रेष्ठींच्याही नजरा लागल्या आहेत. मात्र, यंदा गावकी-भावकीपेक्षा कोण किती खर्च करणार तोच निवडून येणार, अशी चर्चा कार्यकर्त्यांकडून होत आहे. गणात भाजपाचे वर्चस्व असल्याने भाजपा आपला बालेकिल्ला राखण्यासाठी आखणी करीत आहे. मात्र, यंदा कांग्रेस,भाजपा, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षातील चार उमेदवार असल्याने ‘काटे की टक्कर’ पहावयास मिळणार आहे. पर्वा न करता मोठ्या प्रमाणात खर्च होऊ लागल्याने कार्यकर्तेही अकधी या उमेदवाराकडे तर कधी त्या उमेदवाराकडे अशा उड्या मारु लागले आहेत. त्यामुळे या गणातील कार्यकर्त्यांची चांगलीच चांदी होत आहे. गणात सर्वसाधारण असल्याने गावकी भावकीपेक्षा खर्च कोण करणार याला महत्त्व आल्याचे बोलले जाते. प्रचारास थोडेच दिवस मिळत असल्याने प्रचारयंत्रणेस वेग आला आला आहे. आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. कोणी किती विकास केला, कोणती कामे केली, आत्ता बदल हवा अशा आशयाच्या पोस्ट व्हॉट्स अ‍ॅपवरून फिरत आहेत. पंचायत समिती गणातून कांग्रेसचे बाळकृष्ण पोटवडे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे साहेबराव कारके, शिवसेनेचे शांताराम भोते व भाजपाचे उमेश बोडके, अपक्ष पुष्पा आनंद गायकवाड हे पाच उमेदवार रिंगणात आहेत. सोमाटणे गणात ओझर्डे, आढे, बेबडोहोळ, पिंपळखुटे, उर्से, परंदवडी, धामणे, गोडुंब्रे, शिरगाव,गहुंजे,सोमाटणे, शिवणे, सडवली आदी गावांचा समावेश आहे. गणात एकूण २८९३८ एवढी मतदार संख्या असून, सोमाटणे व उर्से या गावांत जास्त मतदार आहेत. पवन मावळातील अत्यंत महत्त्वाच्या या गणाकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.