Maval Lok Sabha Result 2024| पिंपरी :मावळ लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची पहिल्या फेरीचा निकाल दहा वाजता आला. त्यामध्ये महायुतीचे उमेदवार श्रींग बारणे (Shrirang Barne) आघाडीवर आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील (sanjog waghere patil) होते. दुसऱ्या फेरीअखेर श्रीरंग बारणे यांनी पंधरा हजारांची आघाडी घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी संथगतीने सुरू आहे. आठ वाजता मतमोजणी सुरुवात झाली. त्यानंतर दोन तासांनी पहिल्या फेरीचा निकाल आला.
दुसऱ्या फेरीअखेर श्रीरंग बारणे यांनी पंधरा हजारांची आघाडी घेतली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणेंना ९६ हजार ५८ मिळाली आहेत तर संजोग वाघेरे यांना ८० हजार ५१३ मते मिळाली. बारणे यांना १५ हजार ५४५ हजार मतांची आघाडी मिळाली आहे.
मतमोजणी होतोय उशीर...
मावळमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे ३१ हजार १९५ तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना २५ हजार ४६१ यांना पहिल्या फेरीअखेर मते पडली होती. सुरुवातीला बारणे हे ५ हजार ४३१ मतांनी आघाडीवर होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उमेदवारांची मते अपडेट केली जात आहे. त्यामध्ये खासदार श्रीरंग बारणे आघाडीवर आहेत. खासदार बारणे यांना ७४ हजार ७४५ तर महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे यांना ६८ हजार ४८३ मते मिळाली आहे. त्यानुसार श्रीरंग बारणे हे ६२६२ मतांनी आघाडीवर होते. दुसऱ्या फेरीअखेर श्रीरंग बारणे यांना १५ हजार ५४५ हजार मतांची आघाडी मिळाली आहे.
चौथ़्या फेरीअखेरीस बारणेंची आघाडी-
चौथी फेरीअखेरीस महायुती श्रीरंग बारणेंना १ लाख ३९ हजार मते मिळाली. महाआघाडी संजोग वाघेरे यांना ८३ हजार ९८२ मते मिळाली. या फेरीअखेरीस बारणेंनी १६ हजार ५७ मतांची आघाडी घेतली आहे.