पिंपरी : वाढदिवसाला केक आणला नाही म्हणून कानाखाली मारली. त्याचा राग मनात धरून तरुणावर कोयत्याने वार केले. मोशी येथे रविवारी (दि. २०) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी १८ वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि. २१) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रोहन रवींद्र नजन (२०, रा. मोशी), ऋषिकेश नागनाथ तेलंग (१९, रा. मोशी) व त्याच्या चार अनोळखी साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढदिवसाचा केक आणला नाही म्हणून फिर्यादी तरुणीच्या भावाने रोहनच्या कानाखाली मारली. याचा राग मनात धरून त्याने त्याचे साथीदार सोबत घेत फिर्यादी तरुणीचा भाऊ व त्याचा मित्र यांना मारहाण केली.
थांब आता तुला जिवंत सोडत नाही, तुला संपवूनच टाकतो, असे म्हणत कोयता डोक्यात मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.