पिंपरी चिंचवड - तृतीयपंथीयांचा आशीर्वाद मिळाला की तो चांगला असतो अशी भावना अनेकांच्या मनात असते, तीच संधी ओळखून अनेक तृतीयपंथी मकर संक्रतीची ओवाळणी म्हणून रुपीनगर परिसरातील घरोघरी जाऊन पैशाची मागणी करत आहेत.निगडी: खरं म्हणजे सार्वजनिक स्थळी असो किंवा घरोघरी जाऊन जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांच्या विरोधात कारवाई व्हावी यासाठीयासाठी शहरातील नगरिकांनी मागणी केली आहे. नागपूर पोलीसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मात्र शहरात नियमांचे उल्लंघन करतील अशा तृतीयपंथीयांच्या विरोधात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. काही दिवसा वर मकर संक्रात हा सण आला आहे. या सणासाठी ओवाळणी (वाण ) म्हणून तृतीय पंथी रुपीनगर परिसरात घरोघरी जाऊन दोनशे ते पाचशे प्रमाणे पैशाची मागणी करत आहेत. पैसे न दिल्यास तृतीयपंथी आमचा तुम्हाला शाप लागेल.आम्हाला दरवाजे कडे पाठ करून परत पाठविल्यास तुमचं वाईट होईल अशा प्रकारच्या बतावण्या करत घरातील महिलांना भीती दाखवत आहेत. या भीतीपोटी महिला घाबरून घरातील दोनशे ते पाचशे रुपये तृतीयपंथीच्या हवाली करत आहेत. पाचशे रुपये पेक्षा पैसे कमी घेण्यास तृतीयपंथी नकार देत आहेत. यामुळे या तृतीयपंथीयांचा बंदोबस्त पोलिसांनी लवकरात लवकर करावा अशी मागणी रुपीनगर परिसरातील महिला व नागरीक करत आहे.
रुपीनगर परिसरात मकर संक्रातीची ओवाळणी म्हणून काही तृतीयपंथीय महिलांना जबरदस्तीने दोनशे ते पाचशे रुपयांची मागणी करत आहेत. पैसे देण्यास नकार दिल्यास मला आमचा श्राप लागेल अश्या बतावण्या करत आहेत.यामुळे आम्ही महिला भयभीत झालो आहेत. -महिला (रुपीनगर) या संदर्भात तातडीने माहिती घेऊन अशा प्रकारे कोणी पैशासाठी जबरदस्ती करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. - नवनाथ मोटे ( सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपीनगर पोलीस चौकी )