शिरूर लोकसभा निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजयी होणार; अजित पवारांचा दावा

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: February 10, 2024 01:46 PM2024-02-10T13:46:25+5:302024-02-10T13:46:42+5:30

सध्या देशात मोदींच्या नेतृत्वावर लोकांच्या प्रचंड विश्वास असून ते तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान होतील

In the Shirur Lok Sabha election only the candidate of the Grand Alliance will win Ajit Pawar claim | शिरूर लोकसभा निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजयी होणार; अजित पवारांचा दावा

शिरूर लोकसभा निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजयी होणार; अजित पवारांचा दावा

पिंपरी : लोकशाही निवडणुकीमध्ये प्रत्येकाला उमेदवार देण्याचा हक्क असतो. त्यामुळे शिरूर लोकसभा निवडणुकीत देखील विरोधकांचा उमेदवार असणार आहे. मात्र, तिथे महायुतीचाच उमेदवार विजयी होणार आहे. सध्या देशात मोदींच्या नेतृत्वावर लोकांच्या प्रचंड विश्वास आहे आणि ते तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान होतील असा दावा अजित पवार यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भुमिपुजन व लोकार्पन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, भविष्यात नियोजित केलेली विकास काम जर आज कर्ज काढून कमी पैशात होत असतील तर ते करायला हरकत नाही. राज्य सरकारनेदेखील समृद्धी महामार्ग कर्ज काढून तयार केला आणि आज त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मुंबई - पुणे एक्सप्रेस वे देखील कर्ज काढून तयार झाला आणि त्याला बनवायला लागले त्याच्या कित्येक पटीने पैसे रिर्टन्स स्वरूपात मिळाले आहेत. मात्र, या मिळालेल्या पैशातून आम्ही दुसरे रस्ते बांधण्यात खर्च करत आहोत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका जर कर्ज घेत असेल तर ते नियमाला धरून असायला हवे. कर्जाचा ताण महापालिकेवर यायला नको. त्यासंबंधी नगर विकास खाते आणि तिथले अधिकारी योग्य ती काळजी घेतील, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

टीडीआरची किंमत काही वाढणार नाही

टीडीआर घोटाळावर बोलतांना अजित पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या टीडीआर घोटाळ्यात बरीच अनियमितता होती. त्यामुळे मी आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या घोटाळ्याला स्थगिती दिली होती. टीडीआर घोटाळ्याला स्थगिती दिल्यामुळे त्या प्रकल्पाची किंमत काही वाढणार नाही, असा दावा देखील अजित पवार यांनी केला आहे.

Web Title: In the Shirur Lok Sabha election only the candidate of the Grand Alliance will win Ajit Pawar claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.