पिंपरी : लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर तपासणी सुरु आहे. विविध भरारी व स्थिर पथके यांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यामध्ये निगडी येथे सर्वेक्षण पथकाकडून २९ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध भरारी व स्थिर पथकांच्या नेमणुका केल्या आहेत. यातील एका पथकाने ही कारवाई बुधवारी (१ मे) केली.
अधिक माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पाच वाजता निगडी येथील सर्वेक्षण पथकाने एका वाहनाची तपासणी केली. या वाहनामध्ये असणारी रोख रक्कम २९ लाख ५० हजार आढळून आली. चौकशी केली असता ही रक्कम दिपक रविंद्र वाणी यांची असल्याचे दिसून आले. कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरण व जप्ती पंचानामा केला आहे.