- शीतल मुंडेपिंपरी : पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) मोशी येथे वाहनतळासाठी अपुरी जागा आहे. नोंदणीसाठी येणारी वाहने, परवाना काढण्यासाठी येणारे वाहनचालक, मोटार ड्रायव्हिंग स्कूलची वाहने अशा विविध कारणांसाठी येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत वाहनतळाची जागा अपुरी असल्याने ही वाहनांचे रस्त्यावर बेकायदा पार्किंग सुरू आहे. त्यामुळे दिव्याखाली अंधार अशी स्थिती आहे.पोलिसांकडून शहराला नागरिकांना वाहतूकीचे नियम शिकविले जातात. नियमांचे उल्लंघन करणारांवर वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करतात. मात्र, वाहतूक परवाना देण्यासाठीचे आरटीओ कार्यालयाबाहेर मात्र बेशिस्त व बेकायदा पार्किंग सहन करीत आहे. आरटीओ कार्यालयात वाहनचालक लायसन काढणे, वाहनांचे पासिंग करणे, वाहनांची नोंदणी करणे अशा कामासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक या कार्यालयात येतात. मात्र आरटीओ कार्यालयाला पुरेसे पार्किंग नसल्याने सर्व गाड्या कार्यालयाच्या बाहेरच अस्ता-व्यस्त पार्किंग केल्या जात असल्याचे चित्र आहे.आरटीओत येणा-या नागरिकांची पार्किंगसाठी गैरसोय होत असल्याचे माहिती असूनही अधिकाºयांना दुर्लक्ष करीत आहेत. तर वाहनांची नोंदणी आणि फिटनेस सर्टिफिकेट कामासाठी स्कुल बस, ड्रायव्हिंग स्कुलची वाहने व पीयुसी देणारे वाहने कार्यालया बाहेरच्या रस्त्यावर गर्दी करीत आहेत.परवाना आमचा, कारवाई पोलिसांचीआरटीओ कार्यालयाबाहेर अस्ताव्यस्त अशा पद्धतीने वाहने उभी केलेली आहेत. कराची थकबाकी असलेली, खटला विभागाकडून ताब्यात घेतलेली वाहने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यातच परमिटसाठी तसेच वाहन परवाना नूतनीकरण, नोंदणी कामानिमित्त या ठिकाणी रोज वाहने येत असतात.कामानिमित्त येणाºया वाहनचालकांना वाहने उभी करण्यास जागा उपलब्ध होत नाही. अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने रहदारीस अडथळा ठरतात. याबाबत आरटीओ अधिकाºयांना विचारले असता, या वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे, असे सांगितले जाते.आरटीओ कार्यालयाच्या वाहनतळासाठी अपुरी जागा असल्याची वस्तु:स्थिती आहे. येथे येणा-या नागरिकांच्या सोयीसाठी आणखी जागेची गरज आहे. पार्किंगसाठी जादा जागा उपलब्ध होण्यासाठी प्राधिकरणाशी पत्रव्यवहार सुरू आहे.- आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड.
वाहनतळासाठी अपुरी जागा : रस्त्यावर केले जातेय राजरोस बेकायदा पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 1:06 AM