शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये झाली वाढ - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 2:12 AM

केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार हे बहुजनांसाठी घातक आहे. शेतीचा संबंध नसणारे मंत्रिमंडळात आहेत. भाजपा सरकारने जनतेला आश्वासनाचे गाजर दाखवले.

तळेगाव दाभाडे - केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार हे बहुजनांसाठी घातक आहे. शेतीचा संबंध नसणारे मंत्रिमंडळात आहेत. भाजपा सरकारने जनतेला आश्वासनाचे गाजर दाखवले. शेतक-यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले. कर्जमाफी झाली नाही. उलट शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत. निवडणुका तोंडावर आल्याने पुन्हा जनतेला भावनिक आवाहन केले जात आहे. हे सरकार बदलण्याची वेळ आली आहे. यापुढे भाजपा आणि मित्रपक्षाच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.येथील मारुती मंदिर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निर्धार परिवर्तन सभा घेण्यात आली. या प्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दत्ता साने, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, शहराध्यक्ष गणेश काकडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, अर्चना घारे, रोहित पवार, हेमलता काळोखे, युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, सुनील दाभाडे, दीपक हुलावळे, सुनील भोंगाडे, कैलास गायकवाड, ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे, संतोष भेगडे, शोभा कदम, विजय पाळेकर, माजी नगराध्यक्षा माया भेगडे, सुभाष जाधव, दत्तात्रय पडवळ, आशिष खांडगे, सुनीता काळोखे, शबनम खान, सुवर्णा राऊत, उपस्थित होते़ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले, घोटाळ्यात भाजपाने ५५० कोटीचे राफेल विमान १६५० कोटींना खरेदी केले. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून याबद्दल स्पष्टीकरण देण्यास कोणीच तयार नाही. काळा पैसा आणू असे म्हणणारे बँकांना गंडा घालून परदेशात गेलेल्यांना पाठीशी घालत आहेत. आश्वासनांची खैरात करणारे भाजपा सरकार सर्वच बाबतीत फेल गेले आहे. ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे यांनी सूत्रसंचालन केले. आभार दीपक हुलावळे यांनी मानले.हायपरलूप प्रकल्प : नागरिकांची दिशाभूलविकासाच्या नावाखाली केंद्र आणि राज्य सरकार शेतकºयांच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान केली जाणारी बुलेट ट्रेन किंवा पुणे ते मुंबई दरम्यानचा हायपरलूप प्रकल्प असेल हा कोणाचा तरी स्वप्नातील प्रकल्प असून त्याला जनतेचा विरोध आहे. शेतकºयांच्या जमिनी याद्वारे कवडीमोल दराने सरकार ताब्यात घेत आहे. ज्याला वेगाने अल्पावधीत एखाद्या ठिकाणी जावयाचे असेल तर त्याकरिता विमान सेवा उपलब्ध आहे. हायपरलूप प्रकल्प जगात कुठे यशस्वी झाला नाही़ त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दोन्ही प्रकल्पांना विरोध आहे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.स्थानिक आमदार, खासदारांचे अपयशबापूसाहेब भेगडे म्हणाले, स्थानिक खासदार आणि आमदारांना तालुक्याचे प्रश्न सोडविण्यास अपयश आले आहे. केंद्र आणि राज्य शासन घेत असलेले निर्णय लोकहिताचे नाहीत. सरकार खोटारडे आहे. लोकांची दिशाभूल करणारे आहे. हे शासन थापाडे आहे. मावळ तालुक्यातील कारखाने खेड तालुक्यात गेले, याला जबाबदार सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना हेच आहेत. प्रास्ताविक बबनराव भेगडे यांनी केले. मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार यांची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी कार्यकर्त्यांच्या वतीने केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारFarmerशेतकरी