शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
3
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
4
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
5
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
6
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
7
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
8
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
9
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
10
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
11
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
12
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
13
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
14
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
15
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
16
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
17
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
18
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
19
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
20
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

सोसायटी बैठकांचा प्रभागात वाढला वेग

By admin | Published: January 25, 2017 2:03 AM

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी दंड थोपटले असून, जोमाने प्रचाराला लागले आहेत.

रहाटणी : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी दंड थोपटले असून, जोमाने प्रचाराला लागले आहेत. चार दिवसांनी निवडणूक अर्ज भरण्याला सुरवात होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडीला मोठ्या प्रमाणात वेग आला असून, सर्वच प्रकारची चाचपणी करण्यासाठी व मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी इच्छुकांकडून कॉलन्यांमध्ये, सोसायटीमध्ये बैठका सुरू आहेत.निवडणुकीचे बाशिंग गुडघ्याला बांधलेले अनेक इच्छुक रात्रीचा दिवस करून कामाला लागले आहेत. एका पक्षाचे कार्यकर्ते गेले की दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते हजर होत आहेत. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत अशा बैठकांचे आयोजन केले जात आहे. दिवसभर महिला बचत गटाच्या महिलांच्या वेगळ्या बैठका, तर रात्री पुरुषांच्या बैठका असा दिनक्रम सुरु असल्याने मतदारही गोंधळात पडला आहे. कोणाला हो म्हणावे व कोणाला नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्हीच आमचे म्हणण्याची वेळ मतदारावर आली आहे. अजून सर्वच राजकीय पक्षांची उमेदवारी यादी जाहीर होणे आहे. तरी संभाव्य उमेदवार म्हणून विविध पक्षाचे कार्यकर्ते, इच्छुक कॉलनी, सोसायटी गावठाण अशा ठिकाणी जाऊन संवाद साधत आहेत. जे कार्यकर्ते किंवा जे इच्छुक आहेत ते कधी कॉलनीत किंवा सोसायटीमध्ये आलेही नव्हते किंवा त्यांना हे माहीतच नाही असे अनेक इच्छुक उमेदवार दिसला माणूस की नमस्कार, हात जोडून नतमस्तक होत आहेत. गाडीची काच कधी खाली न करणारेही सध्या गल्ली-गल्लीत पायी फिरत आहेत. (वार्ताहर)