विश्वास मोरे - पिंपरी : देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणजेच पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी असून, पंचवीस वर्षांत शहर जेवढे वाढले त्या तुलनेत पाणीआरक्षण वाढलेले नाही. परिणामी, अपुऱ्या पाणीपुरवठ्यास नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. भामा आसखेड आणि पवना बंदिस्त जलवाहिनी योजना आणि चोवीस तास पाणी योजनाही कागदावरच आहे. मावळातील पवना धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत पाणी सोडलेले पाणी रावेत येथे आल्यानंतर तेथील बंधाऱ्यातून पाणी उचलून निगडी प्राधिकरणातील जलशुद्धिकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. त्यानंतर शहरातील टाक्यांमध्ये नेले जाते. तेथून शहरभर जलवाहिनीद्वारे नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पुरविले जाते. पवना धरणातून शहराला दिवसाला ४८० एमएलडी पाणी आरक्षण मिळाले आहे. मात्र, लोकसंख्या वाढीचा आलेख पाहता, पाणी आरक्षणात बदल झालेला नाही.
योजनाना गती द्यायला हवीपवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प दहा वर्षांपासून ठप्प आहेत. तर भामा आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी आणण्याची योजनाही कागदावरच आहे. परिणामी कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा याचा त्रास नागरिकांना आणि शहराला होत आहे. आवश्यकता ११० एमएलडीची राष्ट्रीय निर्देशांकानुसार प्रतिमाणसी दरडोई पाणी दिवसाला १३५ लिटर आवश्यक आहे. महापालिकेचे पाणी नियोजनाकडे दुर्लक्ष होत असून, औद्योगिकनगरीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ........पंचवीस वर्षांत बावीस लाख लोकसंख्यागेल्या पंचवीस वर्षांत औद्योगिकनगरीची लोकसंख्या २२ लाखांवर गेली आहे. दिवसेदिवस लोकसंख्येत वाढच होत आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वाढलेले नाही. त्यामुळे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाचे पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष होत आहे. औद्योगिकनगरीची लोकसंख्या वाढली पाणी आरक्षण कधी वाढणार, असा प्रश्न आहे..............तीस एमएलडी पाण्याची तूट गेल्या पाच वर्षांत पाच पट लोकसंख्या वाढली आहे. पाच वर्षांत १ लाख २९ हजार ५२५ एवढी कुटुंबे आणि लोकसंख्या ९ लाख ४९ हजार ६७५ ने वाढली आहे. त्यामुळे नवीन लोकसंख्या वाढीचा आलेख पाहता, प्रतिमाणसी १३५ याप्रमाणे आता वाढलेल्या लोकसंख्येला ११० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. सध्या तूट ही तीस एमएलडीची आहे. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी तूट वाढत असताना आरक्षण वाढण्याची गरज आहे. पर्यायी पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्याची गरज आहे. पाणी आरक्षण वाढवून मिळावे, यासाठी जलसंपदा मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे. भामा आसखेड, आंध्रा धरणातून पाणी आणण्याच्या योजनांना गती देण्याचे काम सुरू आहे. नवीन योजना झाल्यास शंभर एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यानंतर इंद्रायणी नदीतून पाणी उचलल्यास शंभर एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यातून समाविष्ट गावांचा तहान भागविली जाणार आहे. पवनातून येणारे पाणी उर्वरित भागाला पुरविले जाईल. - राहुल जाधव, महापौर .......लोकसंख्येत वाढ होत असताना पाणी आरक्षण वाढलेले नाही. त्यामुळे पाणीप्रश्नाला समोरे जावे लागत आहे. पाण्याच्या तक्रारी कमी करण्याचा प्रयत्न असणार आहे. भामा आसखेड, आंध्रा धरणातून पाणी आणण्याच्या योजनांना गती दिल्यास पाणी प्रश्न सुटू शकणार आहे. दिवसाआड पाण्याची सायकल आपण नियमित केल्यानंतर काही भागात पाण्याच्या तक्रारी होत्या. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. - मकरंद निकम, सहशहर अभियंता...देशातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणजेच पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी असून पंचवीस वर्षांत शहर जेवढे वाढले त्या तुलनेत पाणी आरक्षण वाढलेले नाही. परिणामी अपूºया पाणीपुरवठ्यास नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. ....वर्ष पाणी वाढलेली आरक्षण लोकसंख्या२०१४-१५ ४७२ एमएलडी १,२९, ५२५२०१५-१६ ४७० एमएलडी १,१३, ५८०२० १६-१७ ४५० एमएलडी १,१६, ९२५२०१७-१८ ५०६ एमएलडी १,२९, ५२५२०१८-१९ ४८० एमएलडी १,८०,२३५२०१९-२० ४८० एमएलडी ८०,४७५ एकूण ९ लाख ४९ हजार ६७५