वडगाव मावळ : बोगस कागदपत्रे बनवून जमीनमालकाला थांगपत्ता न लागता त्याची जमीन परस्पर विकायचा धंदा काही टोळ्यांनी अधिकाºयांना व एजंटांना हाताशी धरून चालू केला आहे़ या बाबत २५ गुन्हे दाखल झाले असून, उपनिबंधक यांच्यावर गुन्हा दाखल आहे. तर बोगस वारस नोंदणीप्रकरणी महसूल खात्यातील काही अधिकारी या जाळ्यात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही़मावळ तालुक्यात उतारे व जमिनी शोधून खोट्या व बनावट कागदपत्राद्वारे महसूल खात्यातील काही अधिकाºयावर व एजंटांना धरून सदर जमिनीचा ७/१२ उताºयावर आपणच खरे मालक असल्याचे भासवून तशी नोंद करून सदरच्या काही जमिनी लाखो रुपये घेऊन विकल्या गेल्या आहेत़ तर काहींचे विकण्याचा प्रयत्न चालू आहे.
मावळ तालुक्यात काही टोळक्यांनी गेल्या दहा पंधरा वर्षांत विविध आडनावांचे व त्याचा कुणालाही थांगपत्ता नसलेल्यांच्या जमिनी शोधून उतारे काढले़ एजंटमार्फत लाखो रुपये देऊन बोगस कागदपत्रांच्या आधारे उताºयावर नोंदी करून घेतल्या़ मूळ मालक जागाहोतोय का याची वर्ष भर वाट पाहिली त्यानंतर मालक न आल्याची खात्री झाल्यावर त्या जमिनीची परस्पर विक्री केली आहे. याबाबत मूळ मालकांचे काही खरे वारसदार जागे झाले असून, काहींनी न्यायालयात दाद मागितली आहे तर काहींनी पोलिसांकडे धाव घेतली अशाच एका प्रकरणात वडगाव पोलिसांनी एक महिन्यापूर्वी एकाला अटक केली आहे. तर सदरची जमीन घेणाºयाने मूळ मालकाने एकही रुपया न घेता १२ एकर जमीन पुन्हा त्याच्या नावावर करून दिली.नायब तहसीलदार सुनंदा भोसले पाटील म्हणाल्या, मयत माणसाच्या ठिकाणी बोगस वारस दाखून त्याचे खोटे कागदपत्रे जोडून वारस नोंदी या पूर्वी झालेल्या नाकारता येणार नाही़ ज्यांच्या अशा नोंदी झाल्यात त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.या बाबत पोलीस निरीक्षक डी़ एस़ हाके म्हणाले, बोगस नोंदीच्या तक्रारी अनेक आल्या आहेत. तपासात अधिकारी दोषी आढळून येईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल.शेतकºयांच्या जमिनीवर पोलिसांची मालकीकामशेत : मावळ तालुक्यातील जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकºयांचा जमिनीचा अकरा गुंठे म्हणून व्यवहार करायचा आणि पूर्ण जमीन आपल्या नावावर नोंद करण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. नाणे मावळात अशीच एक घटना समोर आली आहे. स्थानिक शेतकºयांच्या जमिनीवर ताबा घेण्यात पोलिसांना जास्त रस असून, यातून ते मोठी मलाई खात आहेत. जमिनीच्या व्यवहारात मोठी कमाई असल्याने मावळातील बहुतेक पोलीस ठाण्यात व स्टेशनमधील पोलीस यात गुंतले आहेत. याचप्रमाणे एखादे साईडवर ठेकेदारी अथवा खंडणीसाठी फोन करून त्रास दिला जात असून, हे प्रकार तालुक्यात सर्रास सुरू आहेत.