चिंचवड : आगामी महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रभाग पद्धतीमुळे मिनी विधानसभा वाटणाऱ्या या निवडणुकीची रणधुमाळी शहरात सुरू झाली आहे. प्रचार यंत्रणा सज्ज आहे. उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी कमी वेळ असल्याने कोपरासभा घेण्यावर भर दिला जात आहे. सर्वच उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत. पक्षाची उमेदवारी मिळण्यास उशीर झाल्याने अनेक उमेदवारांना घरोघरी जाता आले नाही. प्रभागाचा विस्तार मोठा असल्याने प्रचार करणे जिकिरीचे झाले आहे. मात्र, प्रभागातील सोसायट्या, सार्वजनिक मंडळे, महिला संघटना, ज्येष्ठ नागरिक यांच्या माध्यमातून प्रचार करण्यासाठी उमेदवार कोपरा सभा घेत आहेत. प्रभागातील मोकळ्या जागा अथवा इमारतीच्या टेरेसवर अशा सभा घेतल्या जात आहेत. परिसरातील जास्तीत जास्त मतदारांना अशा सभेसाठी आमंत्रित केले जात आहे.अशा सभेत विकासकामाबाबत चर्चा होत आहेत. मतदारांच्या असणाऱ्या समस्या जाणून घेत आहेत. प्रभागात आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्याचे आश्वासन अनेक उमेदवार देत आहेत. (वार्ताहर)
उमेदवारांचा कोपरासभा घेण्यावर वाढला भर
By admin | Published: February 14, 2017 2:03 AM