पिंपरी : एकीकडे प्रतिबंधात्मक कारवाई करून पोलीस गुंडांच्या मुस्क्या आवळत आहेत, तर दुसरीकडे गुंडांची, चोरट्यांची दहशत कमी झालेली दिसून येत नाही. मोरवाडीत कंपनीच्या प्रवेशद्वारावरील रखवालदारास मारहाण करून कंपनीतील माल चोरून नेण्याची घटना नुकतीच घडली. झुंडीने येणाऱ्या चोरटयांची थेट रखवालदारावर हल्ला करून कंपनीतील माल चोरून नेण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे.पोलिसांकडून गन्हेगारांवर तडिपारीची कारवाई करण्यात येत आहे. काहींना स्थानबद्ध केले. तडिपारीच्या आदेशाचा भंग करून वावरणाऱ्यांना जेरबंद केले. ठिकठिकाणी कोम्बिंग आॅपरेशन करून गुन्हेगारांच्या घरांची घडती घेण्या आली. त्यांच्याकडे आढळून आलेली शस्त्र जप्त करण्यात आली. या कारवाई सुरू असताना, रखवालदाराला मारहाण करून चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. पोलिसांचा वचक कमी झाल्याने हे प्रकार घडू लागले आहेत. अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यकत करीत आहेत. (प्रतिनिधी)
गुंडांसह चोरट्यांची वाढतेय दहशत
By admin | Published: January 30, 2017 2:54 AM