पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयास मंजुरी मिळाली असली, तरी एक मे रोजी पोलीस आयुक्तालय सुरू करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवरील कार्यवाही थंडपणे सुरू आहे. पोलीस आयुक्तांनी महापालिकेच्या भोईरनगर प्रेमलोक पार्क येथील जागा सुचविली आहे. ही जागा देण्यासंदर्भात कार्यवाही अजूनही झालेली नाही. त्यामुळे मंगळवारचा मुहूर्त टळणार आहे.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीचे नागरीकरण वाढत असताना गुन्हेगारीही वाढली आहे. शहराची लोकसंख्या २२ लाखांवर पोहोचली आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करावे, अशी मागणी काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कालखंडातही झाली होती. मात्र, आघाडी सरकारच्या कालखंडात निर्णय झाला नव्हता. भाजपाची सत्ता आल्यानंतर ही मागणीही पुन्हा जोर धरू लागली. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी याबाबत विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधीही मांडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची घोषणा केली. वर्षभर हा प्रस्ताव विविध विभागांत मंजुरीसाठी होता.आयुक्तालयासाठी महाराष्टÑ दिनाचा मुहूर्त गाठण्याचे नियोजन होते. याबाबत पोलीस आयुक्तांनी तीन जागांची पाहणी केली होती. त्यांपैकी चिंचवड येथील प्रेमलोक पार्क परिसरातील एका जागेला पसंती दिली होती. याबाबतचे पत्र महापालिकेला दिले आहे. मात्र संबंधित ठिकाणी महापालिकेची शाळा असल्याने ती स्थलांतरित होईपर्यंत आयुक्तालयास जागा मिळणे अशक्य आहे. तसेच याबाबतचे पत्र अजूनही पालिकेच्या भूमी आणि जिंदगी विभागात पोहोचलेले नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तालयास किती जागा द्यायची आहे आणि त्यासाठी महापालिका किती भाडे आकारणार आहे, याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे एक मेचा मुहूर्त टळणार आहे. कोणतेही पत्र आले नसल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.पोलीस आयुक्तालयासंदर्भात पोलिसांनी तीन जागांची पाहणी केली होती. त्यापैकी एका जागेस पसंती दिली आहे. संबंधित ठिकाणी महापालिकेची शाळा आहे. ही शाळा स्थलांतरित करणे आवश्यक आहे. या इमारतीपासून काही मीटर अंतरावर नवीन शाळा बांधून तयार आहे. ही शाळा स्थलांतरित केल्यानंतरच ही जागा पोलीस आयुक्तालयास दिली जाईल.- श्रावण हर्डीकर, आयुक्तपोलीस आयुक्तालयासंदर्भात पोलिसांनी तीन जागांची पाहणी केली होती. त्यापैकी एका जागेस पसंती दिली आहे. संबंधित ठिकाणी महापालिकेची शाळा आहे. ही शाळा स्थलांतरित करणे आवश्यक आहे. या इमारतीपासून काही मीटर अंतरावर नवीन शाळा बांधून तयार आहे. ही शाळा स्थलांतरित केल्यानंतरच ही जागा पोलीस आयुक्तालयास दिली जाईल.- श्रावण हर्डीकर, आयुक्त
स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा मुहूर्त टळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 6:49 AM