पिंपरी : येथील सावित्रीबाई फुले स्मारकाच्या इमारतीमध्ये मुलींसाठी यूपीएससी व एमपीएससीच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासिकासुरू करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने ३ जानेवारीला ही अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली.सावित्रीबाई फुले स्मारकाच्या इमारतीच्या ठिकाणी महापालिकेच्या विविध विभागांची कार्यालयेसुरू करण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र, स्मारक समिती व विविध संघटनांनी या प्रस्तावाला विरोध केला. त्यानंतर महापौरनितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्ष सीमा साळवे व गटनेते एकनाथ पवार यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. त्यानंतर स्मारक समितीच्या शिष्टमंडळाबरोबर महापालिकेचे पदाधिकारी व नगरसेवकांची गुरुवारी बैठक झाली. या वेळी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक नामदेव ढाके, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर आदी उपस्थित होते.
मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका; पदाधिका-यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 2:52 AM