मोशी : इंद्रायणी नदीचे पाणी हवेली आणि खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र देहू आणि आळंदी या पुण्यभुमीमध्ये असलेल्या चिखली, तळवडे, मोई, मोशी, चिंबळीे, डुडूळगांव, केळगांव, चºहोली, गोलेगांव, मरकळ आदी ठिकाणच्या गावातील शेतकरीवगार्ना शेतीसाठी व पिण्यासाठी तसेच जनावरांना पिण्यासाठी या पाण्याचा फायदा व्हावा म्हणून जलसंपदा विभाग महाराष्ट्रा शासनाने इंद्रायणी नदीवर देहू ते मरकळ या ठिकाणी जवळपास सहा ते सात बंधारे बांधले आहेत. या परिसरात उन्हाळ्यात शेतीला व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून शासनानच्या वतिने दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की बंधारांना ढापे टाकून पाणी आडविले जाते, परंतू त्या अगोदर पासूनच जलपणीर्ने वेढले आहे त्यामुळे संपूर्ण नदीपात्रातील पाणी दुषित झाले आहे.जलपर्णी बरोबरच पिपंरी-चिंचवड महापालिका हदीतील तळवडे, चिखली, एमआयडीसीचे, साडपांणी व आॅइल मिश्रित रासायनिक पाणी थेट या इंद्रायणी नदीत सोडले जाते त्यामुळे नदीचे पुर्णपणे दुषित आहे. त्यामुळे जलपर्णी कुजली असल्याने माशांसह इतर जलचर प्राणी मुत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहे. हवेली आणि खेड तालुक्याच्या हद्दीतून चिंबळीेव मोशी या दोन्ही गावच्या मधील इंद्रायणी नदीवर महाराष्ट्र शासनाच्या वतिने बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयाजवळ नदीपात्रातील उगम झालेलीजलपर्णी कुजली असल्याने पाणी दुषित झाले आहे.
इंद्रायणी झाली प्रदूषित, जलपर्णी कुजल्याने नदीपात्रातील जलचरही संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 6:26 AM