शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
2
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
3
Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण
4
Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा
5
Crime Video: मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; हादरवून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद
6
पुणे जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात मविआत बंडखोरी; कोणत्या मतदारसंघात कसं आहे चित्र?
7
'भूल भूलैय्या ३'ने 'सिंघम अगेन'ला केलं धोबीपछाड! Box Office कलेक्शनमध्ये कार्तिक आर्यनचा सिनेमा ठरला सरस
8
इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य
9
तेजीची हवा निघाली...! दिवाळी संपताच जोरदार आपटले सोने-चांदी! पटापट चेक करा कशी असेल आजची स्थिती?
10
"जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
11
Noel Tata Joins Tata Sons : टाटा कुटुंबात १३ वर्षांत पहिल्यांदा झालं 'हे' काम, रतन टाटांच्या निधनानंतर काय बदललं?
12
"महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही, कुणीही मागणी केलेली नाही"; फडणवीस स्पष्टच बोलले
13
IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल
14
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
15
Bhaubeej 2024 : रिंकू राजगुरूने लाडक्या भावाबरोबर साजरी केली भाऊबीज, पाहा फोटो
16
बर्थडे दिवशी किंग कोहलीचा खास अंदाज; अनुष्कासोबत या ठिकाणी झाला स्पॉट (VIDEO)
17
राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
18
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
19
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
20
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?

उद्योगनगरीला करवाढीचा दणका; महापालिकेच्या ५२६३ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 4:18 AM

महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी सकाळी साडेअकराला सादर केलेला अर्थसंकल्पास स्थायी समितीने सायंकाळी दोन तासांच्या चर्चेनंतर उपसूचनांसह मंजूर दिली. प्रशासनाने मिळकत कर आणि पाणीपट्टीत सुचविलेली भरघोस वाढ स्थायी समितीने कायम ठेवत २०१८-१९ या वर्षाचा मूळ ३५०६ कोटी, तर केंद्राच्या विविध योजनांसह ५२६३ कोटींचा व १८१ कोटी १० हजार रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे.

पिंपरी : महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी सकाळी साडेअकराला सादर केलेला अर्थसंकल्पास स्थायी समितीने सायंकाळी दोन तासांच्या चर्चेनंतर उपसूचनांसह मंजूर दिली. प्रशासनाने मिळकत कर आणि पाणीपट्टीत सुचविलेली भरघोस वाढ स्थायी समितीने कायम ठेवत २०१८-१९ या वर्षाचा मूळ ३५०६ कोटी, तर केंद्राच्या विविध योजनांसह ५२६३ कोटींचा व १८१ कोटी १० हजार रुपये शिलकीच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे. अर्थसंकल्पात नव्या योजनांचा अभाव असून, जुन्या योजनांच्या सक्षमीकरणावर भर दिला आहे.महापालिका स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. आयुक्त श्रावण हर्डीकर आणि मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी समितीला अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाबाबतच्या बैठकीची वेळ ही सकाळी अकराची होती. मात्र, सभापती आणि आयुक्त वगळता अन्य सदस्य वेळेवर उपस्थित नव्हते. त्यामुळे साडेअकराला सभा सुरू झाली.अर्ध्या तासाच्या भाषणात आयुक्तांनी अर्थसंकल्पाचे सादरीकरण केले. त्यानंतर सायंकाळी साडेसहालास्थायी समितीने आयुक्तांच्या अर्थसंकल्पाला दोन तासांच्या चर्चेनंतर मान्यता दिली.महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी मालमत्ताकर व पाणीपुरवठा लाभकर नव्याने समाविष्ट करण्यास आणि पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. आयुक्तांनी करवाढीसह सादर केलेल्या करवाढीला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या वेळी अभ्यासास वेळ हवा म्हणून तातडीने अर्थसंकल्प मंजूर करू नये, अशी भूमिका राष्टÑवादी काँग्रेसच्या सदस्यांनी घेतली. राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे, वैशाली काळभोर, अनुराधा गोफणे यांनी विरोध नोंदविला. येत्या २६ फेब्रुवारीला होणाºया सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पावर विशेष सभा होणार आहे.पुढील आर्थिक वर्षाच्या ३५०६ कोटींच्या मूळ अर्थसंकल्पात ५८५ कोटी ७२ लाख रुपये शिल्लक दाखविले आहेत. जमा बाजूला तब्बल ४५.४५ टक्के म्हणजे सुमारे १५९४ कोटी रुपये स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) माध्यमातून उत्पन्न अपेक्षित धरले आहे. त्या खालोखाल मालमत्ता करातून ४६५ कोटी आणि बांधकाम परवाना विभागातून ३५० कोटी, पाणीपट्टीमधून ७० कोटी आणि गुंतवणुकीवरील व्याजातून १७० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.खर्चाच्या बाजूला जेएनएनयूआरएममधील कामांसाठी महापालिकेच्या हिश्शापोटी १२७५ कोटी रुपयांची घसघशीत तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय पाणीपुरवठा विभागासाठी २१९ कोटी, वैद्यकीय विभागासाठी १५७ कोटी, आरोग्यासाठी २५६ कोटी, प्राथमिक आणि दुय्यम शिक्षणासाठी १७८ कोटी, सार्वजनिक सुरक्षितता व स्थापत्यसाठी २२९ कोटी रुपये अशा प्रमुख तरतुदी आहेत. उत्पन्नाची तूट भरून काढण्यासाठी करसंकलन व बांधकाम परवाना विभागाकडून थकबाकी वसुलीवर भर देण्यातयेणार आहे. प्रभागस्तरीय विकासकामांवरील तरतुदीमध्येही वाढ केली असून शहरी गरिबांसाठी ९२९ कोटी, महिलांच्या विविध योजनांसाठी ३३ कोटी, अपंग कल्याणकारी योजनांसाठी २० कोटी रुपयांची तरतूद आहे. स्मार्ट सिटी, अमृत अभियान, स्वच्छ भारत अभियान आणि पंतप्रधान आवास योजना या सरकारी योजनांसाठी भरीव तरतूद आहे.स्थायी समितीने केलेले बदलस्थायी समितीने उपसूचना देऊन अर्थसंकल्प मंजूर केला आहे. त्यात आकाशचिन्ह परवाना अंतर्गत मिळणारे १६.७ कोटी उत्पन्न आणि भूसंपदानातून शिल्लक राहणारी ११ कोटी अशी एकूण २७.२ कोटींची रक्कम जमेच्या तपशिलात वाढली आहे. त्यापैकी दहा कोटी रुपये शहरविकास आराखड्यात टाकले आहेत. तर उर्वरित रक्कम शिक्षण विभाग आणि संगणक विभागात टाकला आहे. तसेच महापालिकेच्या विविध योजनांना राष्टÑपुरुषांची नावे देण्यात आली आहेत.खर्च रकमेचा आलेख खर्च तपशील रक्कम रुपये टक्केसामान्य प्रशासन विभाग ५५,७७,४३,००० १.६२शहर रचना व नियोजन ४८,६०,२०,००० १.४२सार्वजनिक सुरक्षितता व स्थापत्य २,२८,७३,३९,५३५ ६.६१वैद्यकीय १,५७,२४,७०,००० ४.५५आरोग्य २,५६,१९,९८,०० ७.४१शिक्षण १,७८,००,०२,००० ५.१७उद्याने व पर्यावरण ७८,६०,३०,००० २.२८इतर विभाग सेवा ३,८४,०२,७९,३६७ ११.११अंदाजपत्रक ‘क’खर्च (महसुली) पाणीपुरवठा २,१९,२०,९२,१४९ ६.३४एलबीटी, करसंकलन भांडवली खर्च (केंद्र पु. यो.) ४५,०१,१७,००० १.३३कामांसाठी मनपा हिश्श्यांसह १२,७४,५६,८३,१५० ३६.८१सर्व निधी ५,२८,८०,००,००० १५.२६एकूण खर्च ३४,६४,७७,७४,२०१ १००

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड