मोशी : एमआयडीसी पोलिसांच्या वतीने मोशी पोलीस चौकी हद्दीत येणाºया पालिकेच्या सावित्रीबाई फुले कन्याशाळा, महात्मा फुले मुलांची शाळा, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे नागेश्वर विद्यालय या ठिकाणी ‘पोलीस काका’ या उपक्रमाची माहिती देण्याकरिता मुलांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमांतर्गत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी सुमारे १७०० ते १८०० विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना सुरक्षात्मक उपाययोजनांची माहिती दिली.शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, मुलांना, तसेच मुलींना वेळीच काही मदत लागल्यास त्यांनी पोलीस काका उपक्रमांतर्गत देण्यात आलेल्या नंबरवर पोलीस काकांनी संपर्क साधावा. त्यांनी शाळेत कळल्यास शाळेकडून देखील तत्काळ आम्हाला संपर्क साधला जावा, स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, मुलांनी सोशल मीडिया वापरताना सायबर क्राइमबाबत सावध राहावे, शाळांनी शिक्षकेतर कर्मचारी नेमताना त्यांची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करून घ्यावी. या वेळी विद्यार्थ्यांना पोलीस काका, महिला पोलीस कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले.तसेच पोलीस काका उपक्रम कसा उपयोगी आहे, त्याची मदत कशी घ्यायची याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.एमआयडीसी पोलीस स्टेशनचे हवालदार रत्नपारखी उपस्थित होत्या.महात्मा गांधी जयंती साजरीचिखली : येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नूर ए इमान सोशल तहेरीक (नीस्ट) या संस्थेच्या वतीने साजरी करण्यात आली. या वेळी नगरसेवक राहुल जाधव, अश्विनी जाधव, संगीता ताम्हाणे, दत्ता साने, मनोज लोणकर, जे. जे. गायकवाड, बी. आर. कांबळे, फिरोज शेख उपस्थित होते.गांधीजींच्या कार्याची दिली माहितीपिंपळे गुरव : दापोडीतील प्रतिभा महिला प्रतिष्ठानाचे द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये लालबहादूर शास्त्री व गांधी जयंती साजरी झाली. या वेळी विद्यार्थ्यांना गांधीजींचे कार्य व महत्त्व सांगितले. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष विजू जगताप, शंकर जगताप, चंद्रकांत इंदुरे, विकास पवार, प्रताप बामणे, स्वाती पवार, प्राचार्या इनायत मुजावर, पर्यवेक्षिका उषा साळवी, सर्व शिक्षक उपस्थित होते. या वेळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
मोशीतील शाळांना दिली पोलीस काका उपक्रमाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 6:33 AM