शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

मॉडेल वॉर्ड कामांची चौकशी करा

By admin | Published: April 26, 2017 3:46 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरात ज्या ज्या भागात मॉडेल वॉर्ड ही संकल्पना राबविण्यात आली, त्या मॉडेल वॉर्डातील कामांची चौकशी करण्याचे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरात ज्या ज्या भागात मॉडेल वॉर्ड ही संकल्पना राबविण्यात आली, त्या मॉडेल वॉर्डातील कामांची चौकशी करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी मंगळवारी (दि. २५) प्रशासनाला दिले. तोपर्यंत ही कामे केलेल्या ठेकेदारांची बिले थांबविण्यास त्यांनी सांगितले. महापालिकेला आर्थिक शिस्त लागलीच पाहिजे. त्यामुळे ठेकेदारांना द्यावयाच्या बिलांबाबत राज्य सरकारने दिलेल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी. ठेकेदारांची २०१६-१७ या वर्षांतील बिले २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद रकमेतूनच देण्यात यावेत, असा अंतिम निर्णय सभेत घेण्यात आल्याचे सावळे यांनी सांगितले. स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिकेने शहरात ठराविक भागात मॉडेल वॉर्ड ही संकल्पना राबविली. अशा मॉडेल वॉर्डमध्ये कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली. मात्र, खरोखरच मॉडेल वॉर्ड झाले आहेत का? याबाबत शंका उपस्थित करावी, अशी परिस्थिती आहे. मॉडेल वॉर्डमध्ये राबविलेल्या कामांमध्ये अनागोंदी कारभार झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महापालिकेने ज्या ज्या भागात मॉडेल वॉर्ड ही संकल्पना राबवून विकासकामे केली, त्याची चौकशी करण्याची गरज असल्याचे सीमा सावळे यांनी सभेत सांगितले. त्यानुसार मॉडेल वॉर्डमध्ये राबविण्यात आलेल्या विकासकामांची चौकशी करण्याचे आदेश दिले.(प्रतिनिधी)