पिंपरी : शादी डॉट कॉम या वेबसाईटवरून ओळख केली. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून लग्न न करता फसवणूक केली. तसेच धमकी दिली. तळवडे येथे २०१६ ते १४ मार्च २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
पीडित महिलेने या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. १५) फिर्याद दिली आहे. विक्रांत विष्णू स्वाईन (वय ३८, रा. रावेत) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने शादी डॉट कॉम या वेबसाइटवरून फिर्यादी अशी ओळख केली. त्यानंतर फिर्यादीला भेटून लग्नाचे आमिष दाखविले. शारीरिक संबंध ठेवून लग्न न करता फसवणूक केली. तुला काय करायचे ते कर, अशी धमकी आरोपीने फिर्यादीला दिली. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.