पिंपरी : विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदी, ताडपत्री खेरदीतील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर कचºयाच्या कंटेनर खरेदीतील भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. अधिकारी व ठेकेदारांमधील रिंग मोडून काढण्यासाठी भाजपाच्या एका पदाधिकाºयाने पुढाकार घेतला आहे. भांडार विभागाच्या दहा वर्षांतील कारभाराची व अधिकाºयांची चौकशी करावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.पालिकेच्या बिन्स कंटेनर खरेदीत मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या तुलनेत दुप्पट दराने सदरची कंटेनर खरेदी करण्यात आले आहेत. महापालिकेच्या संबंधित अधिकाºयांनी याबाबत सत्ताधारी भाजपाला अंधारात ठेवले आहे. अधिकारी, भाजपा पदाधिकारी आणि शहरवासीयांच्या डोळ्यात धुळफेक करून कंटेनर खरेदीचा गैरव्यवहार केला आहे. हे प्रकरण भाजपाचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी उघडकीस आणले आहे. दोषी अधिकाºयांचे निलंबन करून संबंधित पुरवठादार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून या व्यवहारातील रक्कम वसूल कण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.कचºयासाठी बिन्स कंटेनर खरेदीची प्रक्रिया महापालिकेच्या भांडार विभागाने राबविली. २३० कंटेनरची पुणे महापालिकेपेक्षा दुप्पट दराने खरेदी केली. महापालिकेकडून साडेचार घनमीटरच्या बिन्स कंटेनरच्या प्रति नगासाठी ७४ हजार ७७७ रुपये दर देण्यात आले. सुमारे पावणेदोन कोटींच्या कंटेनरची खरेदी करण्यात आली. सुमारे ८० लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे थोरात यांचे म्हणणे आहे. निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली नाही.कंटेनर खरेदीची प्रक्रिया ई-निविदा पद्धतीने झाली आहे. ती पारदर्शक असून, नियमानुसार कार्यवाही केली आहे. त्यात चुकीचे काहीही नाही. याबाबत काही आक्षेप असतील, तर त्यांची चौकशी केली जाईल, असे सह आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी सांगितले.भांडारच्या कारभाराबाबत आक्षेपविठ्ठल-रुक्मिणी मूर्ती, ताडपत्री खरेदी प्रकरणात महापालिकेतील भांडार विभाग संशयाच्या भोवºयात आहे़ अन्य विभागाचे खरेदीचे अधिकार कमी करून विभागाला खरेदीचे आणखी अधिकार वाढविले आहेत. खरेदी प्रकरणात दोषी आढळणारे अधिकारी, कर्मचारी त्याच पदावर आहेत. बिन्स कंटेनर खरेदीत गैरव्यवहार झाल्याची चौकशी करावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना थोरात यांनी पत्र दिले आहे.
‘भांडार’च्या गैरकारभाराची होणार चौकशी; भाजपाच्या पदाधिका-यानेच घेतला पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 4:21 AM