वाकड : हिंजवडीतील आयटी कंपनीत दुचाकीवरून कामास जात असलेल्या तरुणीचा सकाळी १० वाजता अज्ञात मोटारीची धडक बसून जागीच मृत्यू झाला. मारुंजी-हिंजवडी रस्त्यावरील लक्ष्मी चौकात हा अपघात घडला असून वाहनचालक अपघातानंतर पसार झाला. प्रतिभा मोहन तांबे (वय २७, रा. संतोषनगर थेरगाव) असे त्या अभियंता तरुणीचे नाव आहे.प्रतिभाचे वडील मोहन गुलाब तांबे यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी प्रतिभा नेहमी प्रमाणे तिच्या (एमएच १४, डीबी ७०९९) या दुचाकीवरून कंपनीत जात होती. लक्ष्मी चौकात एका अज्ञात वाहनाची तिच्या दुचकीला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. हिंजवडीतील विप्रो कंपनीत ती वरिष्ठ पदावर सेवेत होती. सीसीटीव्ही कॅमेºयात अपघाताचे चित्रीकरण कैद झाले आहे. त्याआधारे पोलीस वाहन चालकाचा शोध घेत आहेत.
आयटी अभियंता तरुणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 6:18 AM