पिंपरी : संगणक अभियंता अंतरा देवानंद दास हिचा शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास तळवडे येथे तिच्या कंपनीजवळच अज्ञात तरुणाने तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून केला. घटनेनंतर हल्लेखोर पळून गेला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास सोपवला असून, तपासासाठी पथक बंगळुरूला रवाना झाले.अंतरा (२३) मूळची पश्चिम बंगालची आहे. ती केपजेमिनी कंपनीत आयटी तंत्रज्ञ म्हणून काम करत होती. तळवडे येथील कॅनबे चौकातून शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास ती पायी जात होती. त्या वेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात तरुणाने तिच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार केले. घटनेनंतर हल्लेखोर तेथून पसार झाला. सत्येंद्र कृष्णानंद शिंपी हे कामावरून घरी जात असताना जखमी अवस्थेत पडलेल्या अंतराला त्यांनी पाहिले. तिला तातडीने चिंचवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)
आयटीतील तरुणीचा पुण्याजवळ खून
By admin | Published: December 26, 2016 5:13 AM