पिंपरी : अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जेसीबी चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चांदखेड फाटा, कोराळे फाटा येथे रविवारी (दि. २६) सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.
अजित साठे, असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचा नाव आहे. युसुफ शेख (वय ३०, रा. चांदखेड), असे आरोपीचे नाव आहे. सचिन भागुजी साठे (वय ३२, रा. ओव्हळे, ता. मावळ) यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ अजित साठे हा त्याची दुचाकी घेऊन हिंजवडी येथे जात होता. त्यावेळी जामखेड फाटा येथे आरोपी युसुफ शेख हा जेसीबी घेऊन अचानक समोर आला. त्यामुळे अपघात होऊन त्यात अजित साठे गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान अजित साठे यांचा मृत्यू झाला.