Pune | हाॅटेलमध्ये झालेल्या लग्नातून चोरी केलेले २६ लाखांचे दागिने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 05:22 PM2023-01-10T17:22:38+5:302023-01-10T17:23:53+5:30

आरोपींवर विविध राज्यांत गुन्हे दाखल...

Jewelery worth Rs 26 lakh stolen from hotel wedding seized hinjewadi police | Pune | हाॅटेलमध्ये झालेल्या लग्नातून चोरी केलेले २६ लाखांचे दागिने जप्त

Pune | हाॅटेलमध्ये झालेल्या लग्नातून चोरी केलेले २६ लाखांचे दागिने जप्त

Next

पिंपरी : हाॅटेलमध्ये झालेल्या लग्न समारंभातून सोन्याचे दागिने व नऊ लाखाची रोकड चोरी केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांच्या तपास पथकाने मध्यप्रदेशात १७ दिवस वास्तव्य करून आरोपींबाबत माहिती मिळवली. तसेच आरोपींच्या नातेवाईकांकडे चौकशी करून २६ लाखांचे ५२ तोळ्यांचे दागिने जप्त केले.    

रितीक महेश सिसोदिया (वय २०), वरुण राजकुमार सिसोदिया (वय २३), शालु रगडो धपानी (वय २८), शाम लक्ष्मीनारायण सिसोदिया (वय ३८, सर्व रा. कडीयासांसी, ता. पचोर, जि. राजगढ, मध्यप्रदेश), अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हाॅटेलमध्ये ६ डिसेंबर २०२२ रोजी लग्न सभारंभ झाला. या सभारंभातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व नऊ लाख रोख रक्कम चोरी करून नेली. हिंजवडी पोलिसांच्या तपास पथकाने या गुन्ह्याचा तपास करीत असताना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. फिर्यादीच्या आईने सोन्याचे दागिने व रोख रक्कम ठेवलेली पर्स अनोळखी व्यक्ती घेऊन जात असल्याचे दिसले. मध्यप्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातील चोरटे अशाप्रकारे लग्नसमारंभात चोरी करू शकतात, अशी माहिती मिळाली. त्यानुसार हिंजवडी पोलिसांच्या तपास पथकाने मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यात १७ दिवस वास्तव्य करून तपास केला. 
 
हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, तपास पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, उपनिरीक्षक रमेश पवार, पोलीस कर्मचारी बाळकृष्ण शिंदे, बंडू मारणे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, बापूसाहेब धुमाळ, अरूण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, सुभाष गुरव, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडीत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.     

आरोपींवर विविध राज्यांत गुन्हे दाखल  

लग्नात चोरी करणारे आरोपी हे राजगड जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. तसेच चोरी केलेला काही ऐवज आरोपींच्या घरी असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी चारही आरोपींचा शोध घेतला. परंतु ते राहते घरी मिळून आले नाहीत. आरोपींच्या नातेवाईकांकडे तपास करून चोरीच्या दागिन्यांपैकी २६ लाखांचे ५२ तोळ्यांचे दागिने पोलिसांनी जप्त केले. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध राज्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपींचा व उर्वरीत दागिन्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: Jewelery worth Rs 26 lakh stolen from hotel wedding seized hinjewadi police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.