पिंपरी :मराठा समाजाला आरक्षण बाबत निर्णय होताच व अध्यादेश मिळतात पिंपरीतील डॉ. आंबेडकर चौकात येथे शनिवारी पेढे भरवून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी मराठा समाज बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात व फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी समाज मारुती भापकर, धनाजी येळकर, सचिन चिखले, हरीश नखाते, संजय जाधव, गणेश सरकटे, गणेश आहेर, नकुल भोईर, दीपक करडे, गोविंद पवार, मीरा कदम, नलिनी पाटील, ज्ञानदेव लोभे, आदीनी जल्लोष केला.
अंतरवाली सराटी येथे आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील व समस्त समाज बांधव यांनी मागील सात महिन्यांपासून जो लढा उभारला होता त्याला यश मिळाले. अखेर आज शनिवारी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्याचे अध्यादेशही काढण्यात आले व तो अध्यादेश मनोज जरांगे यांना देण्यात आला. ही घोषणा करताच समाज बांधवांनी जल्लोष केला. घोषणनेनंतरच मराठा समाजाच्या आनंदाला उधाण आलं असून एकच जल्लोष सुरू आहे.