शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
6
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
8
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
9
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
10
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
11
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
12
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
13
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
14
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
15
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
16
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
17
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
18
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
19
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
20
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना

कामशेतला विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 4:05 AM

येथील पंडित नेहरू विद्यालयात शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर वर्गात विद्यार्थ्यांची भांडणे झाली. भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांना एका शिक्षकाने काही न विचारता अमानुष मारहाण केली. यात या दोन्ही मुलांची पाठ काळी निळी झाली असून, एका मुलाच्या कानाला दुखापत झाली असल्याचे बोलले जात आहे.

कामशेत : येथील पंडित नेहरू विद्यालयात शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर वर्गात विद्यार्थ्यांची भांडणे झाली. भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांना एका शिक्षकाने काही न विचारता अमानुष मारहाण केली. यात या दोन्ही मुलांची पाठ काळी निळी झाली असून, एका मुलाच्या कानाला दुखापत झाली असल्याचे बोलले जात आहे.शाळा सुटल्यानंतर आठवीच्या वर्गात काही विद्यार्थ्यांची भांडणे सुरू होती. ही भांडणे सोडवण्यासाठी पूजन सूरज मिस्त्री (वय १४) व मयूर जनार्धन ननावरे (वय १२) हे गेले असता गोंगाट काय सुरू आहे. हे पाहण्यासाठी आलेल्या एका शिक्षकाने भांडणे करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोडून या दोघांना पायातील बुटाने बेदम मारहाण केली. त्यांना तिसºया मजल्यावरून मारत मारत खाली आणले. यात या दोन्ही मुलांची पाठ काळी- निळी झाली असून त्याना मोठी दुखापत झाली आहे.घरी गेल्यावर हा सर्व प्रकार पालकांना कळताच त्यांनी दुसºया दिवशी शाळेत येऊन संबंधित शिक्षकाला आमच्या समोर हजर करा, अशी मागणी केली. या वेळी सरपंच सारिका घोलप, शिवसेना शहरप्रमुख गणेश भोकरे, गणेश बोºहाडे, सुजित सातकर, विशाल शिंदेआदी मुख्याध्यापकांना जाब विचारण्यासाठी आले होते. त्यामुळे शाळेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.- संबंधित शिक्षक आज गैरहजर असून ते सोमवारी आल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक माहुले यांनी सांगितले. या मुलांचे पालक पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाच्या विरोधात तक्रार देण्यास गेले. मात्र शाळा प्रशासन व पालक यांच्यात परस्पर तडजोड होऊन तक्रार दिली गेली नसल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक