शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

केशवनगर येथे डोक्यात दगड घालून कामगाराचा खून, पिंपरी-चिंचवडमध्ये खुनाचं सत्र सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 5:00 PM

चिंचवड येथील केशवनगर परिसरात डोक्यात फरशी घालून एका कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला. केशवनगरजवळ जखमी अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने रविवारी सकाळी ११च्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

पिंपरी, दि. 24 -  चिंचवड येथील केशवनगर परिसरात डोक्यात फरशी घालून एका कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला. केशवनगरजवळ जखमी अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने रविवारी सकाळी ११च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. राम सनेही (वय ३२, रा. मध्य प्रदेश), असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे.घटना स्थळाची पाहणी केली असता पोलिसांनी हा खून दारूच्या नशेत केला असावा, असा अंदाज व्यक्त केला. आसपासच्या परिसरात संबंधित कामगारांना कोणीही ओळखत नाही. चिंचवड येथील केशवनगर भागात एका पत्र्याच्या शेडमध्ये मृत इसम आणि त्याचा आणखी एक साथीदार राहत होते. येथेच आरोपीने दारूच्या नशेत भांडणात रामच्या डोक्यात फरशी घातली, त्याचा खून केला. खून करून मृतदेह ओढत नेऊन जवळच असलेल्या गवतात फेकून दिला. हा खून शनिवारी रात्री झाला असून रविवारी सकाळी परिसरातील नागरिकांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली. चिंचवड पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली आहे. मात्र आरोपीची ओळख पटलेली नाही, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरात खुनाच्या सात घटना घडल्या आहेत. आॅगस्टमध्ये ३ आॅगस्टला स्वाती संजय वाघोलीकर या तरुणीचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले.  २१ आॅगस्टला शंकर झेंडे यांचा डोक्यात प्रहार करून खून केल्याचे उघडकीस आले. निगडी येथे ही घटना घडली, आरोपींनी अपघात घडल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला होता. दुचाकीची चावी दिली नाही म्हणून बालाजीनगर येथे २८ आॅगस्टला सतीश इंदले या तरुणाचा खून झाला. आॅगस्ट महिन्यातील खून सत्र संपले नाही तोच सप्टेंबरच्या सुरूवातीला १ सप्टेंबरला वाकड येथे महेश वाळवे या तरूणाचा पाचशे रूपये उसने देण्यास नकार दिला म्हणून खून करण्यात आला. २ सप्टेंबरला आदित्य जैद या विद्यार्थ्याचा खून झाला. काही दिवस उलटले नाही तोच ११ सप्टेंबरमध्ये देहू रोडला एकाचा डोक्यात दगड घालून खून झाला. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राम सनेही या परप्रांतीय कामगाराचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली.